मुंबई, 31 डिसेंबर: विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं सेंच्युरियन टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. विराटची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिका (Vamika) या देखील ऐतिहासिक विजयाच्या साक्षिदार होत्या.
टीम इंडियानं सेंच्युरियन टेस्टमध्ये पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. या टेस्टच्या शेवटच्या दिवशी विराटला चिअर करण्यासाठी अनुष्का शर्मा मुलगी वामिकासह स्टेडियममध्ये उपस्थित होती.
वामिकानं तिचे बाबा विराट कोहलीला मॅचच्या दरम्यान चिअर केले. वामिकाचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर वामिकाच्या फोटोवर हार्टचा इमोजी लावून तो व्हायरल होत आहे. विराट आणि अनुष्कानं त्यांच्या मुलीचा चेहरा जगाला न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे वामिकाचा फोटो या पद्धतीनं व्हायरल होत आहे.
विराट आणि अनुष्का यांनी यापूर्वीही अनेकदा वामिकाचा चेहरा सर्वांपासून लपवला आहे. त्याचबरोबर वामिकाचा फोटो न काढण्याचं आवाहन केले आहे. (Instagram)
अनुष्का शर्मानं काही दिवसांपूर्वी वामिकाचा फोटो शेअर न केल्याबद्दल मीडियाचे आभार मानले होते. (Anushka Sharma/Instagram)