Home /News /sport /

IND vs ENG: टीम इंडियाच्या खेळाडूंची उडाली होती झोप, रात्रभर सतावत होती 'ती' काळजी!

IND vs ENG: टीम इंडियाच्या खेळाडूंची उडाली होती झोप, रात्रभर सतावत होती 'ती' काळजी!

टीम इंडियाच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानं भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील 5 वी टेस्ट रद्द झाली. ही टेस्ट रद्द होण्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंची काय अवस्था होती, याचा आता खुलासा झाला आहे.

    मुंबई, 11 सप्टेंबर : टीम इंडियाच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानं भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील 5 वी टेस्ट रद्द झाली. चौथ्या टेस्टदरम्यान टीमचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri), बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर (R Sridhar) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यानंतर पाचव्या टेस्टच्या एक दिवस आधी टीमचे फिजियो योगेश परमार (Yogesh Parmar) यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं, त्यामुळे भारतीय खेळाडूंचा सराव रद्द करण्यात आला. यानंतर टॉसच्या तीन तास आधी मॅचही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 'टाईम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार गुरुवारी रात्री भारतीय खेळाडू व्यवस्थित झोपू शकले नाहीत. ते पहाटे 3 वाजेपर्यंत दोन्ही बोर्ड काय निर्णय घेणार याची प्रतीक्षा करत होते. टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर त्यांच्या परिवारासह आले होते. त्यामुळे त्यांना मुलांची काळजी सतावत होती. अगदी शेवटच्या क्षणी रद्द झालेल्या 5 व्या टेस्टचं आयोजन भविष्यात केले जाऊ शकते. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड या विषयावर चर्चा करत आहेत. या सीरिजमध्ये टीम इंडिया सध्या 2-1 नं आघाडीवर आहे. 'दोन्ही देशांचे बोर्ड पाचवी टेस्ट आयोजित करण्यासाठी भविष्यात काम करतील', असं बीसीसीआय सचिव जय शहा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले होते. IND vs ENG: पाचवी टेस्ट रद्द होताच BCCI In Action, गांगुली करणार ब्रिटनचा दौरा याबाबतचं एक प्रसिद्धीपत्रक बीसीसीआयने जाहीर केलं आहे. तसंच बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड सामंजस्याने रद्द झालेली ही टेस्ट मॅच भविष्यात वेळ असेल तेव्हा खेळवतील. यासाठी तारीख शोधली जाईल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे, याबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही, असं बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england

    पुढील बातम्या