ब्रिस्बेन, 18 जानेवारी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. या संपूर्ण मालिकेत भारतीय क्रिकेट टीमनं जिद्दीनं खेळ केला आहे. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा दुसरा डाव 36 रनवर संपुष्टात आला होता. त्या लज्जास्पद परिस्थितीमधून या टीमनं या मालिकेत कमबॅक केलं. विराट कोहलीची (Virat Kohli) अनुपस्थिती तसंच प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींचा फटका बसूनही भारतीय टीमनं या मालिकेत जोरदार खेळ केला आहे. भारताचे माजी कॅप्टन आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी या खेळाबद्दल टीम इंडियाला मानवंदना दिली आहे. काय म्हणाले गावसकर? 7cricket या ट्विटर हँडलवरुन गावसकर यांच्या आवाजातील खास व्हिडीओ (Video) शेअर करण्यात आला आहे. “या मालिकेत आपण जे काही पाहिलं ते अविस्मरणीय आहे. या खेळाडूंचा संकल्प, दृढता आणि स्पिरीट हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असं गावसकर यांनी या व्हिडीओत म्हंटलं आहे.
🗣 "What we've witnessed in this series is something extraordinary."
— 7Cricket (@7Cricket) January 17, 2021
🗣 "The resolve, fortitude and reserves of spirit displayed by these players has been inspiring."
A tribute to India, from Sunil Gavaskar #AUSvIND pic.twitter.com/WUjW1ZPNN2
भारतासमोर 328 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवशी भारतासमोर विजयासाठी 328 रनचं आव्हान ठेवलं. ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग 294 रनवर संपुष्टात आली. भारताकडून मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj ) सर्वात जास्त पाच विकेट्स घेतल्या. सिराजनं याच मालिकेतील मेलबर्न टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं. प्रमुख बॉलर्सच्या अनुपस्थितीमध्ये तिसरी टेस्ट खेळणारा सिराज ब्रिस्बेनमध्ये भारताचा सर्वात वरिष्ठ बॉलर आहे. त्यानं आपली भूमिका चोख बजावत 73 रन देऊन पाच विकेट्स घेतल्या. सिराजला मुंबईकर शार्दुल ठाकूरनं (Shardul Thakur) उत्तम साथ दिली. शार्दुलनं 61 रन देऊन 4 विकेट घेतल्या. शार्दुलनं पहिल्या डावातही 3 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर त्यानं बॅटिंग करताना भारताकडून सर्वात जास्त 67 रन काढले होते. पावसाचा अडथळा कायम ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्या दिवशी पावसाचा दोनदा अडथळा आला. आता पाचव्या दिवशी देखील पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यासाठी ब्रिस्बेन टेस्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणं आवश्यक आहे. भारताला ट्रॉफी आपल्याकडं कायम राखण्यासाठी ही टेस्ट ड्रॉ केली तरी पुरेसं आहे.

)







