मुंबई, 1 जुलै: इंग्लंडच्या महिला टीमनं दुसऱ्या वन-डे मध्ये भारतीय महिला टीमचा (IND W vs ENG W) पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयाबरोबरच इंग्लंडनं 3 वन-डे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून कॅप्टन मिताली राजनं (Mithali Raj) 59 रन काढले. पण मिडल ऑर्डरनं निराशा केली. भारताची टीम 50 ओव्हर्समध्ये 221 रनवरच आऊट झाली. ओपनिंग बॅटर शफाली वर्मानं (Shafali Verma) 55 बॉलमध्ये 44 रनचे योगदान दिले. भारताने सलग दुसऱ्या वन-डेमध्ये टॉस गमावला. शफाली आणि स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांनी पहिल्या विकेटसाठी 54 रनचा पार्टनरशिप केली. स्मृती 22 रन काझून आऊट झाली. भारताच्या 17 व्या ओव्हरमध्ये शफालीनं सोफी एक्सेस्टोनच्या बॉलिंगवर मोठा फटका मारण्यासााठी पुढे आली. मात्र त्यावेळी तिचा अंदाज चुकला. शफालीनं यावेळी पाय मागे घेत स्वत:ची विकेट वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तिचा हा प्रयत्न पाहून महेंद्रसिंगह धोनीची (MS Dhoni) आठवण आली. धोनीनं याच पद्धतीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्वत:ची विकेट वाचवली होती. शफालीला मात्र यश मिळाले नाही. शफाली आऊट झाल्यानंतर नवा वाद सुरु झाला आहे. महिला क्रिकेटमध्येही LED लाईट्समध्ये चमकणारे स्टंप हवे आहेत. पुरुषांच्या वन-डे आणि टी 20 क्रिकेटमध्ये तसे स्टंप असतात. त्यामुळे थर्ड अंपायरला अंपायरला रन आऊट किंवा स्टंपिंगचे निर्णय देण्यासाठी सोपे जाते. अशी मागणी आता करण्यात येत आहे.
This is the second time in 2 ODI’s that we are making harder than it needs to be for the third umpire. Be great to get bright coloured bails pic.twitter.com/0bXAdO1jMw
— Lisa Sthalekar (@sthalekar93) June 30, 2021
IPL दरम्यान विराटला दिला होता नकार ? न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं उलगडलं रहस्य ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू लिसा स्थळेकरनं याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. " सलग दुसऱ्या मॅचमध्ये आपण अंपायर्सच्या अडचणी वाढवल्या. रंगीत स्टंप असतील तर त्यांचं काम सोपं होईल, असं ट्विट लिसानं केलं आहे.