भारताच्या पहिल्या सत्राचत पाच विकेट्स झटपट गेल्या. एका बाजूनं विकेट्स पडत असताना विराट कोहली खंबीरपणे दुसरीकडे उभा होता. पहिल्या टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये देखील विराट उभा होता. त्याला कुणीही साथ दिली नाही. दुसऱ्या टेस्टमध्ये आर. अश्विननं (R. Ashwin) ही कमतरता भरुन काढली. जॅक लीच आणि मोईन अली हे इंग्लंडचे स्पिनर धोकादायक बनले होते. या स्पिनर्सचा कोहली-अश्विन जोडीनं शांतपणे सामना केला. पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झालेल्या विराट कोहलीने दुसऱ्या इनिंगमध्ये निर्णायक क्षणी हाफ सेंच्युरी झळकावली. विराटची ही टेस्ट क्रिकेटमधील 25 वी हाफ सेंच्युरी आहे.R Ashwin has slammed his fifth Test hundred!
His brilliant innings has extended India’s lead beyond 450 👀#INDvENG ➡️ https://t.co/DSmqrU68EB pic.twitter.com/rD4fKTFQ7n — ICC (@ICC) February 15, 2021
विराट आणि अश्विन जोडीनं सातव्या विकेटसाठी 96 रनची भागिदारी केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सातत्यानं चांगली बॅटिंग करणाऱ्या आर. अश्विननं देखील टेस्ट क्रिकेटमधील 12 वी हाफ सेंच्युरी झळकावली. 2017 नंतरची ही अश्विनची पहिलीच हाफ सेंच्युरी आहे. भारताचा स्कोअर 200 च्या पुढे गेल्यानंतर विराट कोहली 62 रन काढून आऊट झाला. त्यानंतरही अश्विननं एका बाजूनं संघर्ष सुरुच ठेवला. अश्विनच्या झुंजार खेळीमुळे भारतानं 250 चा टप्पा ओलांडला. भारताचे नऊ आऊट झाल्यानंतर अश्विनची सेंच्युरी हुकणार अशी शंका निर्माण झाली होती. त्यावेळी अश्विननं जिद्दीनं खेळ करत घरच्या मैदानावर सेंच्युरी झळकावण्याचा पराक्रम केला आहे.25th Test fifty for Virat Kohli 👏
He has put up a half-century stand with R Ashwin for the seventh wicket!#INDvENG ➡️ https://t.co/DSmqrU68EB pic.twitter.com/1zKM2jlTBi — ICC (@ICC) February 15, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, England, India, India vs england, R ashwin, R ashwin century, Sports, Virat kohli