
लंडन, 30 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टेस्ट सीरिज 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या सीरिजपूर्वी भारतीय क्रिकेटपटू परिवार आणि मित्रांसोबत लंडन आणि जवळपासची शहरांमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. इंग्लंडमध्ये कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही, तरीही विकेटकिपर-बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) फुटबॉल मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गच्च भरलेल्या मैदानात गेला. (फोटो : Rishabh Pant instagram)

इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेटपटूंना 20 दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. सर्व खेळाडू बऱ्याच दिवसांपासून बायो-बबलमध्ये होते. त्यामुळे त्यांना फ्रेश होण्यासाठी हा ब्रेक देण्यात आलाय. या ब्रेकमध्ये पंतनं फुटबॉल मॅचचा आनंद घेतला.

पंतनं युरो कपमधील इंग्लंड विरुद्ध जर्मनी मॅच पाहिली. या मॅचमध्ये इंग्लंडनं जर्मनीचा 2-0 नं पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.

पंत त्याच्या मित्रांसोबत स्टेडियममध्ये उपस्थित होता. त्यानं त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पंतनं पहिल्या इनिंगमध्ये 4 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 41 रन काढले. या मॅचमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला.




