IND vs ENG : भर मैदानात बेन स्टोक्सचं खाली डोकं आणि वर पाय! VIDEO होतोय व्हायरल

IND vs ENG : भर मैदानात बेन स्टोक्सचं खाली डोकं आणि वर पाय! VIDEO होतोय व्हायरल

इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं (Ben Stokes) तिसऱ्या दिवशी एकही विकेट घेतली नाही, किंवा त्यानं बॅटिंगही केली नाही. तरीही स्टोक्सला चेन्नईच्या प्रेक्षकांनी दाद दिली.

  • Share this:

चेन्नई, 16 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी मैदानात जमलेल्या प्रेक्षकांना सेलिब्रेशनच्या अनेक संधी मिळाल्या. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) अवघड परिस्थितीमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. कोहली आणि आर. अश्विननं (R. Ashwin) 96 रन्सची पार्टनरशिप केली. या पार्टरनरशिपमध्ये अश्विननं काही चांगले फटके देखील लगावले.

कोहली आऊट झाल्यानंतरही अश्विन थांबला नाही. अश्विननं पाचवी टेस्ट सेंच्युरी झळकावली तेंव्हा आपल्या गावच्या सर्वात मोठ्या क्रिकेटपटूला मानवंदना देण्यासाठी उपस्थित प्रेक्षकांनी एकच गजर केला. अश्विनच्या सेंच्युरीच्या वेळी मोहम्मद सिराजनं केलेलं सेलिब्रेशनही सर्वांच्या कौतुकाचा विषय होता.

बेन स्टोक्सलाही मिळाली दाद

इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं (Ben Stokes) तिसऱ्या दिवशी एकही विकेट घेतली नाही, किंवा त्यानं बॅटिंगही केली नाही. तरीही स्टोक्सला चेन्नईच्या प्रेक्षकांनी दाद दिली.ड्रिंक ब्रेकच्या दरम्यान बेन स्टोक्स चक्क हातावर उलटा होऊन चालू लागला. त्याच्या या कृतीनं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन झालं. त्याचबरोबर सोशल मीडियावरही त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

चेन्नईच्या फिरत्या पिचवर बॅटिंग कशी करायची असते हे आर. अश्विननं तिसऱ्या दिवशी दाखवून दिलं. आठव्या क्रमांकावर आलेल्या अश्विनने त्याच्या टेस्ट करियरमधील पाचवी सेंच्युरी झळकावली. अश्विननं अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये बॅटिंग करताना 148 बॉलमध्ये 14 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 106 रन काढले.

(हे वाचा : IND vs ENG : अश्विनच्या सेंच्युरीनंतर सिराजचं जबरदस्त सेलिब्रेशन Viral, पाहा VIDEO)

अश्विनच्या सेंच्युरीमुळे टीम इंडियानं दुसऱ्या इनिंगमध्ये 286 रन केले. इंग्लंडसमोर ही टेस्ट जिंकण्यासाठी 482 रन्सचं खडतर आव्हान ठेवलं.

भारताला पहिलं यश डॉम सिब्लीच्या रुपानं मिळालं. अक्षर पटेलनं ही विकेट घेतली. त्यानंतर रॉरी बर्न्स आणि डॅनियल लॉरेन्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी 32 रनची पार्टरनरशिप केली अश्विनननं बर्न्सला (25) आऊट करुन ही जोडी फोडली. त्यानंतर चौथ्या नंबरला नाईट वॉचमन म्हणून जॅक लीच उतरला होता. त्याला अक्षर पटेलनं पहिल्याच बॉलवर आऊट केलं.

Published by: News18 Desk
First published: February 16, 2021, 10:50 AM IST

ताज्या बातम्या