ओव्हल, 2 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात हेडिंग्लेमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा मोठा पराभव झाला होता. या पराभवाचा विचार करण्यापेक्षा लॉर्ड्समध्ये मिळवलेल्या विजयापासून टीम इंडियानं प्रेरणा घ्यावी असा सल्ला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी दिला आहे. तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडिया 78 रनवर ऑल आऊट झाली होती. ही निराशाजनक कामगिरीच निकालामध्ये निर्णायक ठरली असं त्यांनी सांगितलं. रवी शास्त्री त्यांचे नवे पुस्तक ‘स्टारगेजिंग’ च्या प्रमोशनाच्या निमित्तानं ‘टाईम्स नाऊ नवभारत’ शी बोलत होते. त्यांनी यावेळी सांगितले की, ’ हे खूप सोपं आहे. तुम्ही फक्त लॉर्ड्सचा विचार करा. मागील मॅच विसरा. हे सांगणं सोपं आहे, याची मला जाणीव आहे. पण तुम्ही फक्त चांगल्या आठवणी लक्षात ठेवल्या पाहिजेत. खेळामध्ये या गोष्टी घडतात.’ शास्त्रींनी पुढं सांगितलं की, ‘लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडचं पारडं जड होतं. तरीही आम्ही विजय मिळवला. मागील मॅचमध्ये त्यांनी चांगली बॉलिंग केली. आम्ही पहिल्याच दिवशी बॅकफुटवर होतो. त्यानंतर आम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये झुंजार खेळाची झलक दाखवली. पण पहिल्या इनिंगमध्ये 78 रनवर ऑल आऊट झालो तेव्हाच मॅच हातामधून निसटली होती. असं असलं तरी अजूनही या सीरिजमध्ये आम्हाला संधी आहे.’ IND vs ENG: चौथी टेस्ट आजपासून, ओव्हलमध्ये असं असणार 5 दिवस हवामान इंग्लिश टीमला इशारा विराट कोहली आणि टीम इंडियाला कमी समजण्याची चूक कुणीही करु नये, असा इशाराही शास्त्री यांनी यावेळी दिला. ‘सध्या सीरिज 1-1 नं बरोबरीत आहे. आम्ही विदेशात खेळत आहोत. आता दबाव इंग्लंडवर आहे. त्यांना त्यांच्या देशात जिंकावं लागेल. ते भारतामध्ये खेळत होते तेव्हा आम्हाला जे हवं ते आम्ही केलं. आता त्यांच्या कोर्टामध्ये बॉल आहे. आता आम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल, यात कोणतीही शंका नाही.’ असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.