• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : इंग्लंडनं टॉस जिंकला, बुमराहच्या जागी 'या' बॉलरचा समावेश

IND vs ENG : इंग्लंडनं टॉस जिंकला, बुमराहच्या जागी 'या' बॉलरचा समावेश

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथ्या आणि शेवटच्या टेस्टला अहमदाबादमध्ये सुरुवात झाली आहे. या सीरिजमध्ये भारताकडं सध्या 2-1 अशी आघाडी आहे.

 • Share this:
  अहमदाबाद, 04 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथ्या आणि शेवटच्या टेस्टला अहमदाबादमध्ये सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं (Joe Root) टॉस जिंकला असून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे. चार टेस्टच्या या मालिकेत सध्या टीम इंडियाकडं 2-1 अशी आघाडी आहे. यापूर्वी याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium)  झालेली तिसरी टेस्ट भारतानं अवघ्या दोन दिवसांमध्ये जिंकली होती. टीम इंडियानं या टेस्टमध्ये एक बदल केला आहे. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी मोहम्मद सिराजचा (Mohammad Siraj) समावेश टीममध्ये करण्यात आला आहे. सिराज यापूर्वी देखील चेन्नईमध्ये बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये दुसरी टेस्ट खेळला होता. इंग्लंडच्या टीममध्येही दोन बदल करण्यात आले आहेत. स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चर यांच्या जागेवर डॉम बेस आणि डॅन लॉरेन्सचा समावेश करण्यात आला आहे. #INDvEND 4th test, day 1: England won the toss and decided to bat first against India at Narendra Modi Stadium in Ahmedabad, Gujarat. India is currently leading the 4 match series 2-1 — ANI (@ANI) March 4, 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची (WTC) फायनल गाठण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं किंवा ड्रॉ करणं आवश्यक आहे. तसं झालं तर लॉर्ड्सवर होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल. भारतानं ही टेस्ट गमावल्यास ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल. तिसऱ्या टेस्टमध्ये पराभूत झाल्यानं इंग्लंडचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. (हे वाचा-6,6,6,6,6,6! एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावणारा पोलार्ड बनला तिसरा खेळाडू, पाहा VIDEO ) चौथ्या टेस्टसाठी भारताची टीम - विराट कोहली, शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन,  इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज चौथ्या टेस्टसाठी इंग्लंडची टीम  - जो रुट, डॉम सिबले, झॅक क्राऊली, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डॉम बेस आणि जेम्स अँडरसन
  Published by:News18 Desk
  First published: