जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG: 'माझं लहाणपणापासूनचं स्वप्न...', टीम इंडियाला हरवताच जो रूटची प्रतिक्रिया

IND vs ENG: 'माझं लहाणपणापासूनचं स्वप्न...', टीम इंडियाला हरवताच जो रूटची प्रतिक्रिया

IND vs ENG: 'माझं लहाणपणापासूनचं स्वप्न...', टीम इंडियाला हरवताच जो रूटची प्रतिक्रिया

टीम इंडियाचा तिसऱ्या टेस्टमध्ये पराभव करताच जो रूट (Joe Root) हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी कॅप्टन बनला आहे. रुटचा हा 55 टेस्ट मॅचमधील 27 वा विजय आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 ऑगस्ट : टीम इंडियाचा तिसऱ्या टेस्टमध्ये पराभव करताच जो रूट (Joe Root) हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी कॅप्टन बनला आहे. रुटचा हा 55 टेस्ट मॅचमधील 27 वा विजय आहे. इंग्लंडकडून सर्वात जास्त टेस्ट मॅच जिंकण्याचा मायकल वॉन (26) रेकॉर्ड रूटनं मागं टाकला आहे. रुटनं या विजयाचं श्रेय संपूर्ण टीमला दिलं. त्याचबरोबर आपलं लहाणपणापासूनचं स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. जो रूटनं या विजयानंतर सांगितलं की, ‘मी मॅचच्या पूर्वीच उल्लेख केला होता की, इंग्लंडची कॅप्टनसी करण्याचं स्वप्न मी लहानपणापासून पाहत होतो. मायकल वॉनच्या पुढं जाण्याचा मला आनंद आहे. पण हे फक्त एक कॅप्टन म्हणून मिळालेलं यश नाही. टीम आणि कोचिंग स्टाफच्या मदतीनं हे शक्य झालं आहे. जो रूटला त्याच्या कारकिर्दीमध्ये कोरोना व्हायरस महामारी, बायो-बबलचा सामना करण्यासाठी वापरण्यात आलेली रोटेशन पॉलिसी याचाही सामना करावा लागला. तसंच त्याच्यावर अनेकदा टीकाही झाली. या सर्वांवर त्यानं सांगितलं की, ‘एक कॅप्टन म्हणून माझा कार्यकाळ मोठा आव्हानात्मक होता. याचा सामना करणे हे आव्हानात्मक होते. पण, हा माझ्या कामाचा भाग आहे. मी यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. मी जोपर्यंत याचा आनंद घेत आहे, मी योग्य दिशेनं काम करत आहे, असं मला वाटत आहे तोपर्यंत हे काम करण्याचा मला आनंद आहे.’ असं रूटनं स्पष्ट केलं. IND vs ENG: ओव्हल टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडियाला द्रविडचं अनुकरण करण्याची गरज 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये आता इंग्लंडने 1-1 ने बरोबरी केली आहे. नॉटिंघममधली पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय झाला होता. सीरिजची चौथी टेस्ट आता 2 सप्टेंबरपासून ओव्हलमध्ये सुरू होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात