मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS: सिडनी टेस्ट ड्रॉ, टीम इंडियानं केले ‘हे’ जबरदस्त रेकॉर्ड्स!

IND vs AUS: सिडनी टेस्ट ड्रॉ, टीम इंडियानं केले ‘हे’ जबरदस्त रेकॉर्ड्स!

 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनीमध्ये झालेली तिसरी टेस्ट अखेर ड्रॉ झाली आहे.  भारतीय टीमनं यावेळी अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड्सची नोंद केली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनीमध्ये झालेली तिसरी टेस्ट अखेर ड्रॉ झाली आहे. भारतीय टीमनं यावेळी अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड्सची नोंद केली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनीमध्ये झालेली तिसरी टेस्ट अखेर ड्रॉ झाली आहे. भारतीय टीमनं यावेळी अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड्सची नोंद केली आहे.

सिडनी, 11 जानेवारी:   भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सिडनीमध्ये झालेली तिसरी टेस्ट अखेर ड्रॉ झाली. या मालिकेतील पहिल्या टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये 36 रनवर संपुष्टात आली होती.  या लज्जास्पद कामगिरीनंतर टीम इंडियानं कमबॅक करत  मेलबर्न टेस्ट जिंकली. त्यापाठोपाठ  सिडनीमध्ये पाचव्या दिवशी दिवसभर जिद्दीनं बॅटिंग करत टेस्ट ड्रॉ केली आहे. टीम इंडियासाठी (Team India) ही ड्रॉ झालेली टेस्ट देखील ऐतिहासिक आहे. भारतीय टीमनं यावेळी अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड्सची नोंद केली आहे.

टीम इंडियाचे जबरदस्त रेकॉर्ड्स

टीम इंडियानं चौथ्या इनिंगमध्ये 131 ओव्हर्स बॅटिंग करत 5 आऊट 334 रन काढले. 1990 पासून चौथ्यांदाच टीम इंडियानं चौथ्या इनिंगमध्ये शंभर पेक्षा जास्त ओव्हर्स बॅटिंग केली आहे. यापूर्वी 1992, 1997 आणि 2002 साली भारतानं ही कामगिरी केली होती. 2002 च्या लॉर्ड्स टेस्टनंतर तब्बल 19 वर्षांनी टीम इंडियानं ही कामगिरी केली आहे.

अजिंक्य रहाणेचा कॅप्टन म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम अजूनही कायम आहे. रहाणेनं यापूर्वी तीन टेस्टमध्ये टीमची कॅप्टन्सी केली होती. यापूर्वीच्या तिन्ही टेस्ट भारतानं जिंकल्या होत्या. सिडनीमध्ये हा रेकॉर्ड मोडण्याची भीती होती. मात्र, टीमनं निर्धारानं खेळत टेस्ट ड्रॉ केली. त्यामुळे रहाणेचा 'अजिंक्य' रेकॉर्ड कायम आहे.

चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 148 रन्सची पार्टरनरशिप केली. ही टीम इंडियासाठी चौथ्या इनिंगममध्ये चौथ्या विकेटसाठी केलेली सर्वोच्च भागिदारी आहे. त्यांनी विजय हजारे आणि रुसी मोदी या जोडीनं 1948-49 मध्ये केलेल्या 139 रन्सच्या पार्टरनरशिपचा रेकॉर्ड मोडला.

आशिया खंडाच्या बाहेर 1979 नंतर पहिल्यांदाच टीम इंडियानं इतकी दीर्घकाळ बॅटिंग केली आहे. या इनिंगमध्ये भारताकडून चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), ऋषभ पंत (Rishabh Pant),  हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या चौघांनी 100 पेक्षा जास्त बॉल बॅटिंग केली. चौथ्या इनिंगमध्ये चार बॅट्समननी 100 पेक्षा जास्त बॉल बॅटिंग करणे हा देखील एक भारतीय रेकॉर्ड आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs Australia