मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS: मेलबर्न टेस्टपूर्वी दोन्ही टीमच्या खेळाडूंची महान क्रिकेटपटूला श्रद्धांजली

IND vs AUS: मेलबर्न टेस्टपूर्वी दोन्ही टीमच्या खेळाडूंची महान क्रिकेटपटूला श्रद्धांजली

मेलबर्नच्या MCG मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला जोन्स (Dean Jones) यांचा परिवार आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन अ‍ॅलन बॉर्डर  (Allan Border)उपस्थित होते. बॉर्डर यांनी जोन्सची पत्नी आणि दोन मुलींसह मैदानाला एक फेरी मारली.

  • Published by:  News18 Desk
मेलबर्न, 26 डिसेंबर:  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसरी टेस्ट शुक्रवारी मेलबर्नमध्ये सुरु झाली. ही टेस्ट सुरु होण्यापूर्वी दोन्ही टीम्सच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स (Dean Jones)  यांना श्रद्धांजली वाहिली. जोन्स यांचे तीन महिन्यांपूर्वी आयपीएल (IPL) स्पर्धेच्या दरम्यान मुंबईमध्ये निधन झाले होते. मेलबर्नच्या MCG मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला जोन्स यांचा परिवार आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन अ‍ॅलन बॉर्डर (Allan Border) उपस्थित होते. बॉर्डर यांनी जोन्सची पत्नी आणि दोन मुलींसह मैदानाला एक फेरी मारली. यावेळी त्यांच्या हातामध्ये जोन्स यांची बॅगी ग्रीन कॅप, गॉगल आणि बॅट होती. त्यांनी मैदानाच्या ग्रेट सदर्न स्टँडपाशी त्यांच्या या सर्व आठवणी ठेवल्या. त्यानंतर दोन्ही टीम्सचे बारावे खेळाडू के.एल. राहुल (KL Rahul) आणि जेम्स पॅटिन्सन (James Pattinson) यांनी हे सर्व साहित्य उचलून जवळच्या एका खुर्चीवर ठेवले. यावेळी मैदानात उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून जोन्स यांना मानवंदना दिली. जोन्स यांची कारकीर्द जोन्स 1984 ते 1992 दरम्यान 52 कसोटी सामने खेळले. त्यात 11 शतकं आणि 14 अर्धशतकांसह 3631 धावा केल्या. 1984 ते 1994 दरम्यान 164 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये त्यांनी 6,068 रन केल्या. एक दिवसीय सामन्यांमध्ये 7 शतकं आणि 46 अर्धशतकं त्यांच्या नावावर आहेत. अ‍ॅलन  बॉर्डरच्या नेतृत्वाखाली पुनरुज्जीवित झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे ते महत्त्वाचे खेळाडू ठरले. 1987 साली ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. त्यावेळी डीन जोन्स यांची कामगिरी महत्त्वाची ठरली.  एक दिवसीय सामन्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्यांचा नावलौकिक होता. 1989 सालची अ‍ॅशेस मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली. त्या टीममध्येही डीन जोन्स होते. ऐन फॉर्मात असताना त्यांना टीममधून काढून टाकलं आणि त्यांनी लगेचच निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर ते कॉमेंटेटर आणि कोच म्हणून शेवटपर्यंत क्रिकेटशी संबंधित होते. त्यांच्या टोकदार कॉमेंट्रीमुळे ते भारतामध्ये विशेष लोकप्रिय होते.
First published:

Tags: Cricket

पुढील बातम्या