मुंबई, 1 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेत सध्या गंभीर स्वरुप धारण केलेल्या ओम्रिकॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा परिणाम क्रिकेट विश्वावरही झाला आहे. नेदरलँडच्या टीमनं दक्षिण आफ्रिकेतील वन-डे सीरिज सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर टीम इंडियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौराही (India tour of South Africa) अनिश्चित आहे. हा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होणार अशी बीसीसीआयला (BCCI) आशा असली तरी याबाबत सरकारचा सल्ला घेण्याची सूचना केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी दिली आहे. आता बीसीसीआयनं ओम्रिकॉनच्या भीतीनं टीम इंडियातील (Team India) खेळाडूला दक्षिण आफ्रिकेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार नाही. इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए (India A vs South Africa A) या टीममध्ये सध्या तीन अनधिकृत टेस्ट मॅचची सीरिज सुरू आहे. या सीरिजमध्ये सहभागी होण्यासाठी शार्दुल दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेला जाणार होता. मात्र बीसीसीआयनं त्याला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस' ने हे वृत्त दिले आहे.
शार्दुल 6 डिसेंबरपासून सुरू होणारी तिसरी अनधिकृत टेस्ट खेळणार होता. त्यापूर्वी त्याला आफ्रिकेत 3 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार होते. ओम्रिकॉनच्या सावटात इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका A यांच्यातील दुसरी अनधिकृत टेस्ट सुरू झाली आहे. हा दौरा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. आम्ही सातत्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या संपर्कात आहोत. सर्व खेळाडू बायो-बबलमध्ये असून त्यांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. आम्हाला केंद्र सरकारकडूनही कोणती मार्गदर्शन सूचना मिळालेली नाही.' असे बीसीसीआयचे सचिव अरुण धूमल यांनी 'इंडियन एक्स्प्रेस' शी बोलताना सांगितले.
IPL 2022: राहुल, श्रेयस, हार्दिकसह बडे खेळाडू बाहेर, सर्व टीममध्ये रंगणार Bidding War
बीसीसीआयनं शार्दुल ठाकूरला दक्षिण आफ्रिकेत पाठवलेलं नसलं तरी न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी20 सीरिजमधील दीपक चहर (Deepak Chahar) आणि इशान किशन (Ishan Kishan) हे खेळाडू दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले आहेत. त्यांनी त्यांचा 3 दिवसांचा अनिवार्य क्वारंटाईन कालावधी देखील पूर्ण केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Covid-19, Shardul Thakur, South africa