सूर्यवंशी सिनेमात अक्षय कुमारसह (Akshay Kumar) कतरिना कैफची (Katrina Kaif) मुख्य भूमिका आहे. या दोघांसोबत धोनी स्क्रीन शेअर करणार का? याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसंच हा फोटो देखील चांगलाच व्हायरल झाला आहे. कोरोना व्हायरसचा मोठा फटका बॉलिवूडला बसला. त्यामुळे अनेक सिनेमांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.सूर्यवंशी सिनेमाचं प्रदर्शनही लांबणीवर पडलं होतं. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 नोव्हेंबर (गुरुवार) हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफसह अजय देवगन आणि रणवीर सिंह यांचीही यात विशेष भूमिका असून या सिनेमाला देशभरात बंपर ओपनिंग मिळण्याची शक्यता आहे.On the sets of #Sooryavanshi with brother @msdhoni . What? Is MS Dhoni acting in the film or happened to filming in the same studio? @akshaykumar pic.twitter.com/BjMkadiZFF
— Gulshan Grover (@GulshanGroverGG) November 2, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, MS Dhoni, Rohit Shetty