
मुंबई, 24 नोव्हेंबर: टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन उन्मुक्त चंद (Unmukt Chand) यानं काही दिवसांपूर्वीच लग्न केले आहे. लग्नानंतर 2 दिवसांनीच उन्मुक्त पत्नीला सोडून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. (PC-Unmukt Chand Instagram)

उन्मुक्तनं वयाच्या 28 व्या वर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता अमेरिकेत क्रिकेट खेळत आहे. (PC-Unmukt Chand Instagram)

उन्मुक्त लग्नासाठी भारतामध्ये आला होता. लग्न झाल्यानंतर 2 दिवसांमध्येच तो बिग बॅश लीग क्रिकेट खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.




