मुंबई, 24 मे : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (BCCI) महिला क्रिकेट टीमला मिळणारी (Indian Women Cricket Team) दुय्यम वागणूक लपलेली नाही. दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या वार्षिक पगारात मोठी तफावत आहे. त्याचबरोबर मागील वर्षी टी20 वर्ल्ड कपचे उपविजेतेपद मिळवल्यानंतर मिळणारी बक्षिसाची रक्कम बीसीसीआयने अजूनही महिला टीमच्या सदस्यांना दिलेली नाही. बीसीसीआयच्या या धोरणावर दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणारी इंग्लंड टीमची सदस्य इशा गुहा (Isa Guha) हिनं नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय महिला टीमला पुरुष टीमच्या बरोबरीने वागणूक दिली तर ती देखील त्यांच्या इतकीच चांगली कामगिरी करेल, असा दावा इशाने केला आहे. महिला क्रिकेटच्या कल्याणासाठी आणखी बरंच काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी खेळाडूंची मजबूत संघटना हवी, असे मत इशाने व्यक्त केले. “महिला क्रिकेटच्या विकासासाठी उपकाराच्या भावनेतून काम केले जाते. त्यांना बरोबरीचा दर्जा मिळण्यासाठी खूप काम करण्याची गरज आहे. (फक्त पगाराची समानता नाही) त्याची खेळाडूंची संघटना हा महत्त्वाचा भाग आहे. भारतीय महिला टीमकडे पुरुषांच्या टीम इतकेच लक्ष दिले तर त्यांचाही दबदबा निर्माण होईल.” असे ट्विट इशाने केले आहे.
Women are made to feel grateful for progress but there is still so much to be done to reach equity (& that isn’t just equal pay). Players associations are a vital part of reaching this. 🇮🇳 women will dominate the 🌍 stage when as much thought goes into the their game as the men https://t.co/W4ouvLe21x
— Isa Guha (@isaguha) May 23, 2021
इशाने पुढे सांगितले की, “पुरुष खेळाडूंचा स्तर वेगळा आहे. महिला खेळाडूंच्या कल्यासाठी पायाभूत स्तरावर समानता हवी. चांगले नेटवर्क, देशांतर्गत क्रिकेटचा मजबूत पाया, कराराचा कालवाधी, मातृत्वाच्या काळात मदत तसेच निवृत्तीच्या योजनेत खेळाडू संघटना चांगले काम करु शकेल. ‘या’ खेळाडूसाठी पाकिस्तानच्या टीम मॅनेजमेंटवर वासिम अक्रम नाराज, म्हणाला… इशाने 8 टेस्ट, 83 वन-डे आणि 22 टी 20 मॅचमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. ती 2005 आणि 2009 साली क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडच्या टीमची सदस्य आहे.