Home /News /sport /

ENG vs PAK: आफ्रिदीचा जावई Flying Kiss जास्त देतो, शोएब अख्तर संतापला

ENG vs PAK: आफ्रिदीचा जावई Flying Kiss जास्त देतो, शोएब अख्तर संतापला

इंग्लंडच्या बी टीमकडून पाकिस्तानचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. या पराभवामुळे पाकिस्तानने तीन सामन्यांची वन-डे मालिका गमावली आहे. पाकिस्तानच्या या खराब कामगिरीवर त्यांचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) संतापला आहे.

    मुंबई, 12 जुलै: इंग्लंडच्या बी टीमकडून पाकिस्तानचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. या पराभवामुळे पाकिस्तानने तीन सामन्यांची वन-डे मालिका गमावली आहे. पाकिस्तानच्या या खराब कामगिरीवर त्यांचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) संतापला आहे. अख्तरनं पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) आणि शाहिद आफ्रिदीचा होणारा जावई, फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदीवर (Shaheen Afridi) जोरदार टीका केली आहे. अख्तरनं क्रिकेट पाकिस्तानला सांगितले की, "शाहीन आफ्रिदीला विकेट्स घेण्यापेक्षा फ्लाईंग किस (Flying Kiss) द्यायला जास्त आवडते. तुम्ही किमान पाच विकेट घ्या आणि रन काढा. त्यानंतर गळे पडा किंवा फ्लाईंग किस द्या. फक्त एक विकेट घेतल्यानंतर हे करण्यात काय अर्थ आहे. या प्रकारचे नखरे करण्यासाठी टीममध्ये जागा दिलेली नाही. इंग्लंडची टीम फक्त अडीच दिवसांमध्ये तयार झाली. तरीही त्यांनी करून दाखवले. तुम्ही 30 दिवसांपासून एकत्र आहात. तरीही इंग्लंड अकादमीच्या टीमविरुद्ध हरला." शाहीन आफ्रिदीनं दुसऱ्या वन-डेमध्ये 8 ओव्हर्समध्ये 37 रन देऊन एक विकेट घेतली होती. तो पहिल्या वन-डेमध्ये विकेट घेणारा एकमेव पाकिस्तानी बॉलर होता. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी वन-डे 12 जुलै रोजी होणार आहे. पाकिस्तानची निराशा बाबर आझमच्या पाकिस्तान टीमची इंग्लंडमध्ये श्रीलंकेसारखी अवस्था झाली आहे. लॉर्ड्सवर रविवारी झालेल्या दुसऱ्या वन-डे मध्ये (ENG vs PAK) इंग्लंडनं पाकिस्तानचा 52 रननं पराभव केला. इंग्लंडच्या बी टीमकडून झालेला पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. इंग्लंडनं लॉर्ड्स वन-डेमधील विजयासह 3 वन-डे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या नवोदीत बॉलिंग अटॅकपुढे पाकिस्तान 248 रनचे आव्हान पार करेल असा अंदाज होता. त्यांच्या बॅट्समननं निराशा केली. वन-डे क्रिकेटमध्ये सध्या नंबर 1 वर असलेल्या बाबर आझमला पुन्हा एकदा मोठा स्कोअर करण्यात अपयश आले. तो 19 रन काढून आऊट झाला. IND vs ENG: आर. अश्विननं पहिल्या टेस्टपूर्वी केली खास रेकॉर्डची नोंद पाकिस्तानची टीम पुन्हा एकदा 200 रनचा टप्पा पार करण्यात अपयशी झाले. इंग्लंडने त्यांना 41 ओव्हरमध्ये 195 रनवरच ऑल आऊट केले. इंग्लंडकडून लोअर ऑर्डरमध्ये बॅटींग करत 40 रनचे मोलाचे योगदान देणाऱ्या ग्रेगरीनं 3 विकेट्स घेतल्या. साकिब महमूद, पार्किसन आणि क्रेग ओवरटन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: England, Pakistan, Shoaib akhtar

    पुढील बातम्या