मुंबई, 20 डिसेंबर : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) नुकतीच जयपूरला एका लग्नात हजेरी लावली. त्यावेळी धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनं भरपूर मजा केली. (PC: Sakshi Dhoni Instagram)
साक्षी धोनीनं या लग्नातील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. यामध्ये ही जोडी एकदम छान दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नासाठी धोनी आणि साक्षी उपस्थित होते. यावेळी त्यांच्यात चांगलीच केमिस्ट्री दिसली.
शांत स्वभावाच्या धोनीला साक्षीनं स्टेजवर नेले. त्यांनी दोघांनी यावेळी नाच देखील केला. (PC: Sakshi Dhoni Instagram)
साक्षीनं एका फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये दोघांच्या भेटीला 14 वर्ष झाल्याचे सांगितले. या फोटोला साक्षीनं जब वी मेट हा हॅश टॅग दिला आहे.
साक्षी आणि धोनीची भेट एका कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली. त्यानंतर 4 जुलै 2010 रोजी त्यांनी लग्न केले. (PC: Sakshi Dhoni Instagram)