मुंबई, 30 जानेवारी : टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) पुन्हा एकदा फॉर्मात आला आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये (County championship division Two) त्यानं सलग तिसऱ्या मॅचमध्ये शतक झळकावलं आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये पुजारानं 3 वेळा शंभरी ओलांडली असून एकदा द्विशतक झळकावत टीमचा पराभव टाळला आहे. पुजाराची खराब फॉर्ममुळे भारतीय टीममधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आयपीएल 2002 पूर्वी झालेल्या ऑक्शनमध्येही (IPL 2022 Auction) त्याला कोणत्याही टीमनं खरेदी केले नाही. त्यानंतर पुजारानं इंग्लंडमध्ये जाऊन कांऊटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. पुजाराच्या शतकामुळे ससेक्सनं डरहमच्या विरूद्ध आघाडी घेतली आहे. चार दिवसांच्या मॅचमधील दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस शुक्रवारी खेळ समाप्त होईपर्यंत ससेक्सनं पहिल्या इनिंगमध्ये 5 आऊट 362 रन केले होते. डरहमनं पहिल्या इनिंगमध्ये 223 रन केले. त्याला उत्तर देताना ससेक्सकडं 139 रनची भक्कम आघाडी आहे. पुजारा 126 बॉलमध्ये 128 रन काढून खेळत आहे. त्याला पाकिस्तानचा विकेट किपर बॅटर मोहम्मद रिझवान 5 रन काढून साथ देत आहे.
ANOTHER 💯!@cheteshwar1 🤯 👏 pic.twitter.com/4nqhzhQjqW
— Sussex Cricket (@SussexCCC) April 29, 2022
34 वर्षांच्या पुजाराचं फर्स्ट क्लास क्रिकेट कारकिर्दीमधील 53 वं शतक आहे. त्यानं यापपूर्वी डर्बीशायरच्या विरूद्ध 6 आणि 201, वार्विकशायरच्या विरूद्ध 109 आणि 12 रन केले होते. पुजारानं या मॅचच्यापूर्वी 228 फर्स्ट क्लास लढतीमध्ये 51 च्या सरासरीनं 17226 रन केले आहेत. यामध्ये 52 शतक आणि 70 अर्धशतकांचा समावेश आहे. 352 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. IPL 2022, RCB vs GT : आरसीबीनं टॉस जिंकला, बँगलोर गुजरातला धक्का देणार? टीम इंडिया जुलै महिन्यांत इंग्लंड दौऱ्यावर एकमेव टेस्ट मॅच खेळण्यासाठी जाणार आहे. त्या टेस्टसाठी पुजारानं दावेदारी भक्कम केली आहे. या टेस्टसाठी टीम इंडियाची निवड करताना पुजारानं इंग्लंडमध्ये केलेल्या खेळींकडं निवड समितीला दुर्लक्ष करता येणार नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर झालेल्या श्रीलंका विरूद्धच्या टेस्ट सीरिजसाठी अजिंक्य रहाणेसह पुजाराची हकालपट्टी करण्यात आली होती. अजिंक्य सध्या केकेआरकडून आयपीएल स्पर्धेत खेळत आहे.

)







