
मुंबई, 12 सप्टेंबर : वेस्ट इंडिजचा स्टार बॅट्समन ख्रिस गेल मैदानात आणि मैदानाच्या बाहेर फॅन्सचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. (pc: chris gayle Instagram)

गेलच्या धमाल मस्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय आहेत. आता गेल एका नव्या अवतारामध्ये दिसणार आहे. (AFP)

युनिव्हर्स बॉस गेल लवकरच एका पंजाबी म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार आहे. गेलनं स्वत: या गाण्याचं पोस्टर प्रसिद्ध केलंय.

ख्रिस गेल सध्या कॅरेबीयन प्रीमियर लीगमध्ये व्यस्त आहे. तो सेंट किट्स अँड नोविस टीमचा सदस्य आहे. (AFP)

गेलनं शनिवारी झालेल्या मॅचमध्ये त्रिनबागो नाईट रायडर्स (TKR) विरुद्ध 18 बॉलमध्ये 35 रनची खेळी केली होती. (pc: chris gayle instagram )




