संतापजनक: चेतेश्वर पुजाराने सहन केली वर्णद्वेषाची झळ!

भारतीय टीममधला (Team India) प्रमुख खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) च्या आयुष्यातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुजाराला इंग्लंडमधील यॉर्कशायर (Yorkshire) या कौंटी टीमकडून खेळताना पुजाराला वर्णद्वेषाची (Racism) झळ सहन करावी लागली, असा गौप्यस्फोट या टीमच्या माजी कर्मचाऱ्याने केला आहे.

भारतीय टीममधला (Team India) प्रमुख खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) च्या आयुष्यातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुजाराला इंग्लंडमधील यॉर्कशायर (Yorkshire) या कौंटी टीमकडून खेळताना पुजाराला वर्णद्वेषाची (Racism) झळ सहन करावी लागली, असा गौप्यस्फोट या टीमच्या माजी कर्मचाऱ्याने केला आहे.

  • Share this:
    मुंबई, 6 डिसेंबर:  ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर असलेल्या भारतीय टीममधला (Team India) प्रमुख खेळाडू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) च्या आयुष्यातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुजाराला इंग्लंडमधील यॉर्कशायर (Yorkshire) या कौंटी टीमकडून खेळताना पुजाराला वर्णद्वेषाची (Racism) झळ सहन करावी लागली, असा गौप्यस्फोट या टीमच्या माजी कर्मचाऱ्याने केला आहे. काय आहे प्रकरण? चेतेश्वर पुजारा इंग्लंडमधील यॉर्कशायर टीमकडून कौंटी क्रिकेट खेळला आहे. पुजारा आशियाई खेळाडू असल्याने आणि त्याच्या कातडीचा रंग पाहून त्याला ‘स्टीव्ह’ अशी हाक मारली जात असे, असा दावा यॉर्करशायरच्या माजी कर्मचाऱ्यांनी केला आहे. यॉर्करशायरचा माजी क्रिकेटपटू अजीम रफीकने टीममध्ये मिळणाऱ्या वर्णद्वेषी वागणुकीला कंटाळून आत्महत्या करण्याचा विचार होता, अशी कबुली यापूर्वी दिली आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू टिनो बेस्ट आणि पाकिस्तानच्या राणा नावेद उल हसन यांनी देखील रफीकच्या आरोपाला बळकटी देणारे पुरावे सादर केले आहेत. इंग्लिश कौंटीमधील या वर्णद्वेषी प्रकरणाची चौकशी सध्या सुरु आहे. या चौकशीत यॉर्कशायर क्लबचे माजी कर्मचारी ताज बट आणि टोनी बाऊरी यांनी टीममधील वर्णद्वेषी वागणुकीबाबत माहिती दिल्याची बातमी ‘क्रिकइन्फो’ ने दिली आहे. प्रत्येक आशियाई खेळाडूची ‘स्टीव्ह’ अशी हेटाळणी होत असे. भारतीय बॅट्समन चेतेश्वर पुजाराला देखील ‘स्टीव्ह’ असे म्हंटले जात, असे बट यांनी सांगितले. आशियाई खेळाडूंबाबत बोलताना अनेकदा टॅक्सी ड्रायव्हर आणि रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचा उल्लेख केला जात असल्याचा दावा बट यांनी केला. बट यांनी सहा महिन्यांच्या आतच यॉर्कशायर क्लबचा राजीनामा दिला होता. बाऊरी हे 1996 पर्यंत टीमचे कोच होते. त्यानंतर 1996 ते 2011 या काळात यॉर्कशर टीमचे सांस्कृतिक विविधता अधिकारी होते. अश्वेत समुदायामध्ये खेळाचा विकास व्हावा यासाठी काम करणाऱ्या क्रिकेट प्रबंधनाचेही बाऊरी सदस्य होते. दरम्यान, चेतेश्वर पुजाराने मात्र या प्रकरणात अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
    Published by:News18 Desk
    First published: