जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL दरम्यान चेतेश्वर पुजारा फॉर्मात, डबल सेंच्युरी करत टाळला टीमचा पराभव

IPL दरम्यान चेतेश्वर पुजारा फॉर्मात, डबल सेंच्युरी करत टाळला टीमचा पराभव

IPL दरम्यान चेतेश्वर पुजारा फॉर्मात, डबल सेंच्युरी करत टाळला टीमचा पराभव

सध्या भारतीय खेळाडू आयपीएल स्पर्धेत व्यस्त आहेत. त्याचवेळी चेतेश्वर पुजारानं (Cheteshwar Pujara) इंग्लंडमध्ये डबल सेंच्युरी झळकावत मोठ्या इनिंगचा दुष्काळ संपवला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 एप्रिल : चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून हकालपट्टी झाली होती. सध्या भारतीय खेळाडू आयपीएल स्पर्धेत व्यस्त आहेत. त्याचवेळी पुजारानं इंग्लंडमध्ये डबल सेंच्युरी झळकावत मोठ्या इनिंगचा दुष्काळ संपवला आहे. इंग्लिश कौंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत (County Championship Division Two) ससेक्सकडून खेळताना त्यानं ही खेळी केली. त्याच्या या द्विशतकामुळे टीमचा पराभव टळला. त्याचबरोबर टीम इंडियातील जागेसाठी पुन्हा एकदा दावा सादर केला आहे. भारतीय टीम इंग्लंडमध्ये जुलै महिन्यात एक टेस्ट खेळणार असल्यानं पुजाराचा हा फॉर्म महत्त्वाचा आहे. 4 दिवसांच्या या सामन्यामध्ये ससेक्सनं डर्बीशायर विरूद्ध शेवटच्या दिवशी 3 आऊट 513 रन केले. मॅच संपण्यास 15 ओव्हर्सचा खेळ बाकी असताना दोन्ही टीमनं मॅच ड्रॉ करण्यास संमती दिली. ससेक्सची टीम फॉलोऑन मिळाल्यानं पुन्हा बॅटींगला उतरली होती. डर्बीशायरच्या 8 आऊट 505 रनला उत्तर देताना ससेक्सची पहिली इनिंग 174 रनवर संपुष्टात आली. दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी जोरदार प्रतिकार केलाय पुजारानं 387 बॉलमध्ये नाबाद 201 रन केले. त्यानं यावेळी तब्बल 467 मिनिटे बॅटींग करत 23 फोर लगावले. ससेक्सचा कॅप्टन टॉम हेन्सनं 243 रन केले.

जाहिरात

चेतेश्वर पुजाराचं फर्स्ट क्लास कारकिर्दीमधील हे 51 वं शतक आहे. यापूर्वी त्यानं 226 मॅचमधील 371 इनिंगमध्ये 51 च्या सरासरीनं 16948 रन केले होते. या मॅचमध्ये त्यानं 17 हजार रनचा टप्पाही पूर्ण केला. पुजारानं टीम इंडियाकडून 95 टेस्टमध्ये 44 च्या सरासरीनं 6713 रन केले आहेत. यामध्ये 18 शतक आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 206 हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च आहे. टेबल टेनिस विश्वाला खूप मोठा धक्का, 18 वर्षांच्या भारतीय खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू! पुजाराला जानेवारी 2019 नंतर टेस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेलं नाही. त्यामुळेच त्याला आणि खराब फॉर्मात असलेला आणखी एक अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला श्रीलंका विरूद्धच्या सीरिजमधून वगळण्यात आले होते. पुजारा यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत शेवटची टेस्ट सीरिज खेळला होता. त्या सीरिजमधील 6 इनिंगमध्ये त्यानं फक्त एक अर्धशतक झळकावलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात