मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /कॅप्टन्सीवरून ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये वाद, स्मिथ उत्सुक पण...

कॅप्टन्सीवरून ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये वाद, स्मिथ उत्सुक पण...

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये (Cricket Australia) कर्णधारपदावरून नवा वाद पाहायला मिळत आहे. जर संधी मिळाली तर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असं स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) म्हणाला आहे, पण प्रशिक्षक जस्टिन लँगर (Justin Langer) यांनी मात्र सघ्या अशी कोणतीही शक्यता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 मार्च : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये (Cricket Australia) कर्णधारपदावरून नवा वाद पाहायला मिळत आहे. जर संधी मिळाली तर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असं स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) म्हणाला आहे, पण प्रशिक्षक जस्टिन लँगर (Justin Langer) यांनी मात्र सघ्या अशी कोणतीही शक्यता नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 2018 साली दक्षिण आफ्रिकेमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्मिथवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली, त्यामुळे स्मिथचं नेतृत्वही गेलं.

न्यूज कॉर्पशी बोलताना स्मिथ म्हणाला, 'याबाबत मी खूप विचार केला. जर मला पुन्हा संधी मिळाली तर मी नेतृत्व करण्यासाठी उत्सुक आहे. हा वाद कायमच माझ्यासोबत राहिल, पण त्यामुळे मला पुन्हा कर्णधार बनण्यात याचा अडथळा येऊ नये. मला पुन्हा कर्णधारपद मिळो अथवा न मिळो, पण केपटाऊनच्या घटनेसोबत मला जगावं लागेल. मागच्या काही वर्षांमध्ये मी खूप काही शिकलो आहे. एक माणूस म्हणून मी आणखी परिपक्व झालो आहे. जरी मला टीमचं नेतृत्व मिळालं नाही तरी टीमच्या कर्णधाराचं मी कायमच समर्थन करेन.'

लँगर यांनी मात्र सध्या तरी कर्णधारपद उपलब्ध नसल्याचं सांगितलं. एबीसी स्पोर्ट्सशी बोलताना लँगर म्हणाले 'आमच्याकडे सध्या दोन चांगले कर्णधार आहेत. भविष्यात आम्हाला ऍशेस आणि टी-20 वर्ल्ड कप खेळायचा आहे. आमचं भविष्य उज्ज्वल आहे. माध्यमांमध्ये कर्णधारपदाबाबत चर्चा सुरू असली, तरी हे पद सध्या उपलब्ध नाही.'

ऑस्ट्रेलियातल्या माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांच्या पुढच्या बैठकीत स्मिथला पुन्हा कर्णधार करावं का नाही, याबाबत चर्चा होईल. एका वर्षाच्या बंदीनंतर स्मिथचं ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये पुनरागमन झालं, त्यानंतर झालेल्या ऍशेस 2019 मध्ये स्मिथने उत्कृष्ट कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला जिंकवून दिलं.

टीम पेन (Tim Paine) हा ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा तर एरॉन फिंच (Aron Finch) वनडे तसंच टी-20 टीमचा कर्णधार आहे. भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानात पराभव पत्करावा लागला, यानंतर टीम पेनची कर्णधारपदावरून हकालपट्टी व्हावी आणि स्मिथला पुन्हा कर्णधार करावं, या मागणीने जोर धरला.

First published: