मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ashes Series गमावल्यानंतर अँडरसनचं ECB कडे बोट, बोर्डाकडे केली मोठी मागणी

Ashes Series गमावल्यानंतर अँडरसनचं ECB कडे बोट, बोर्डाकडे केली मोठी मागणी

अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) गमावल्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेट टीमवर जोरदार टीका होत आहे.  या पराभवानंतर इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) याने देशाच्या क्रिकेट बोर्डाकडे (ECB) बोट दाखवलं आहे.

मुंबई, 31 डिसेंबर : अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) गमावल्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेट टीमवर जोरदार टीका होत आहे. या सीरिजमधील 2 टेस्ट अद्याप बाकी आहेत. त्यापूर्वीच इंग्लंडनं ही सीरिज गमावली आहे. तीन्ही टेस्टमध्ये इंग्लंडनं निराशाजनक खेळ करत ही सीरिज गमावली आहे. या पराभवानंतर इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) याने देशाच्या क्रिकेट बोर्डाकडे (ECB) बोट दाखवलं आहे.

मेलबर्न टेस्ट गमावल्यानंतर इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं (Joe Root) काऊंटी चॅम्पियनशिप क्रिकेटच्या दर्जावर टीका केली होती. तसंच देशात चांगले क्रिकेटपटू तयार होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले होते. रूटच्या या मागणीला अँडरसननं देखील पाठिंबा दिला आहे.

अँडरसननं 'क्रिकइन्फो' शी बोलताना सांगितले की, 'काऊंटी क्रिकेटमध्ये खेळाडूंना शिकण्याची संधी मिळते. पण तरूण खेळाडूंना सध्या अवघड परिस्थितीत खेळ सुधारण्याचे प्रशिक्षण मिळत नाही. 2015 साली व्हाईट बॉल क्रिकेटला प्राधान्य मिळाले. त्यानंतर या खेळाचा दर्जा सुधारला. आता रेड बॉल क्रिकेटला प्राधान्य देण्याची गरज आहे.

माझ्या मते 2015 साली झालेल्या वर्ल्ड कपनंतर लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटला मोठे प्राधान्य देण्यात आले. लिमिटेड ओव्हर्स आणि टेस्ट क्रिकेटमधील संतुलन हळू-हळू योग्य होत आहे. पण, अजुनही लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटला प्राधान्य आहे. गेल्या काही वर्षात टेस्ट क्रिकेटमधील आमची कामगिरी नियमित नाही. या कामगिरीचा विचार केला तर हे संतुलन आणखी योग्य करता येईल.

T20 Player Of the Year: स्मृती मंधाना बेस्ट खेळाडूंच्या रेसमध्ये, 'या' खेळाडूंशी टक्कर

कौंटी क्रिकेटमध्ये पिचचा स्तर आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, त्यावर काम करण्याची गरज आहे,' असा सल्लाही अँडरसननं दिला. अ‍ॅशेस सीरिज गमावल्यानंतर कॅप्टन जो रूटवर सर्वबाजूंनी टीका होत आहे. अँडरसननं त्याच्या कॅप्टनला साथ दिली आहे. टीममधील प्रत्येक जण रूटचा आदर करतो. त्याला बाहेर कोण काय बोलतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे अँडरसनने स्पष्ट केले.

First published:
top videos

    Tags: Ashes, Cricket news, James anderson