बेलग्रेड (सर्बिया), 23 जून : जागतिक क्रमवारीत नंबर वन असणारा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याला Coronavirus ची लागण झाली आहे. एका टेनिस टूर्नामेंटला गेला असताना इतर काही संसर्ग झालेल्या खेळाडूंपासून जोकोविचला लागण झाली. जोकोविचची पत्नीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.
नोवाक जोकोविचच्या टीमने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, मंगळवारी आलेल्या चाचणी अहवालात जोकोविचला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. जोकोविचच्या दोन मुलांची चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे.
Top-ranked tennis star Novak Djokovic tests positive for the coronavirus after taking part in a tennis exhibition series he organized in Serbia and Croatia. Djokovic is the fourth player to test positive for the virus after playing in those exhibitions. https://t.co/F52tSUFiX5
— The Associated Press (@AP) June 23, 2020
बेलग्रेडला पोहोचल्या पोहोचल्या जोकोविचने चाचणी करून घेतली. क्रोएशियाच्या नियमांप्रमाणे लक्षणं दिसत नसल्यामुळे जोकोविचची चाचणी झाली नव्हती. त्यामुळे आपल्या देशात म्हणजे सर्बियात परत आल्यानंतर लगेच त्याने चाचणी घेतली.
नोवाक जोकोविचची पत्नी येलेना (Jelena Djokovic) गरोदर आहे. तिलाही कोरोनाची लागण झाली आहे. जोकोविच क्रोएशियात अॅड्रिया टेनिस टूर्नामेंटला गेला होता. तिथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम व्यवस्थित पाळले गेले नसल्याची तक्रार येत आहे. काही खेळाडूंना कोरोनाची लागण झालेली होती आणि त्यांच्यामुळेच संसर्ग पसरला, असे आरोप आता होत आहेत.
संकलन, संपादन - अरुंधती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus