इंग्लंड दौऱ्यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघाची झाली कोरोना चाचणी; धक्कादायक बाब आली समोर

इंग्लंड दौऱ्यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघाची झाली कोरोना चाचणी; धक्कादायक बाब आली समोर

इंग्लंड दौर्‍यावर जाण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जून : इंग्लंड दौर्‍यावर जाण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पाकिस्तानचा लेग स्पिनर शादाब खान, वेगवान गोलंदाज हारिस रऊफ आणि 19 वर्षीय फलंदाज हैदर अली यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. हे खेळाडू कोविड - 19 पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही हेडर अली, हरीस रऊफ आणि शादाब खान हे तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली आहे. पीसीबीने सांगितले की या तीन खेळाडूंमध्ये कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत, परंतु रावळपिंडी येथे चाचण्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.

तिन्ही खेळाडू इंग्लंडला जाऊ शकणार नाहीत!

रविवारी पाकिस्तान संघ इंग्लंड दौर्‍यावर रवाना होणार आहे आणि त्यापूर्वी सर्व खेळाडूंची कोरोना तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये त्यांचे तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. पाकिस्तानने इंग्लंड दौर्‍यासाठी 29 सदस्यीय संघाची निवड केली आहे आणि आता त्यात शादाब खान, हैदर अली आणि हॅरीस रऊफ हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. आता या तिन्ही खेळाडूंना इंग्लंडला जाणे अशक्य झाले आहे.  आता या खेळाडूंवर पाकिस्तानमध्ये उपचार केले जातील.

सध्या जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दौरा करणाऱ्यांची चाचणी करणे अनिवार्य आहे. यामध्ये कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातात.

हे वाचा-9 वर्षांची असताना क्रिकेट टीममध्ये झाली दाखल; अनेक रेकॉर्ड तोडून रचला इतिहास

 

First published: June 22, 2020, 10:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading