बर्मिंघम, 5 ऑगस्ट : कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) भारतीय कुस्तीपटूंनी ऐतिहासिक कामगिरी करत लागोपाठ तीन गोल्ड मेडल पटकावली आहेत. फायनलमध्ये भारताच्या दीपक पुनियाने (Deepak Punia) पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा 86 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये पराभव केला. याआधी आजच साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनीही कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं हे 24 वं पदक आहे. भारताला आतापर्यंत 9 गोल्ड, 8 सिल्व्हर आणि 7 ब्रॉन्झ मेडल मिळाली आहेत. त्याआधी साक्षी मलिकने महिलांच्या 62 किलो वजनी गटात साक्षी मलिकने फायनलमध्ये कॅनडाच्या एना गोडिनेज गोंजालेजचा पराभव केला. रियो ऑलिम्पिक 2016 मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱ्या साक्षीचं मागच्या 6 वर्षांमधल्या मोठ्या स्पर्धांमधलं हे पहिलंच मेडल आहे.
#CommonwealthGames | Wrestler Deepak Punia wins gold by defeating Pakistan's Muhammad Inam in men's 86kg final
— ANI (@ANI) August 5, 2022
(File Pic) pic.twitter.com/g2eg6U6Rb3
बजरंग पुनियाने फायनलमध्ये कॅनडाच्या लछलन मॅकनीलचा 9-2 ने पराभव केला. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱ्या बजरंगने सेमी फायनलमध्ये इंग्लंडच्या जॉर्ज रॅमवर विजय मिळवत फायनल गाठली होती. अंशु मलिकलाही सिल्व्हर भारताची 21 वर्षांची रेसलर अंशु मलिकचं (Anshu Malik) गोल्ड मेडल मात्र थोडक्यात हुकलं. महिलांच्या 57 किलो वजनी गटात अंशुने सिल्व्हर मेडल जिंकलं.