जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियातून बाहेर, IPL मध्येही जागा नाही, पुजारा आता या टीमकडून खेळणार!

टीम इंडियातून बाहेर, IPL मध्येही जागा नाही, पुजारा आता या टीमकडून खेळणार!

टीम इंडियातून बाहेर, IPL मध्येही जागा नाही, पुजारा आता या टीमकडून खेळणार!

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हा सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी (India vs Sri Lanka) पुजाराची टीम इंडियात निवड झाली नाही. तसंच आयपीएलमध्येही (IPL 2022) पुजारावर कोणत्याच टीमने बोली लावली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 मार्च : चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हा सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी (India vs Sri Lanka) पुजाराची टीम इंडियात निवड झाली नाही. तसंच आयपीएलमध्येही (IPL 2022) पुजारावर कोणत्याच टीमने बोली लावली नाही, यानंतर आता पुजारा काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. यंदाच्या काऊंटी मोसमात पुजारा ससेक्सकडून (Sussex) खेळणार आहे. काऊंटी चॅम्पियनशीपसोबतच (County Championship) तो वनडे कपही खेळताना दिसेल. पुजारासोबत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानसोबतही (Mohammad Rizwan) ससेक्सने करार केला आहे, त्यामुळे पुजारा आणि रिझवान यांना एकत्र खेळताना पाहता येईल. काही दिवसांपूर्वी फॉर्म परत मिळवण्यासाठी पुजारा रणजी ट्रॉफीमध्येही (Ranji Trophy) खेळत होता. ससेक्सने ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडऐवजी (Travis Head)पुजाराला टीममध्ये घेतलं आहे. हेड आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार असल्यामुळे ससेक्सने त्याला रिलीज केलं आहे. ससेक्स टीमचा भाग झाल्यामुळे मला उत्साही आणि सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे. काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी मी कायमच उत्साही असतो, त्यामुळे मी या मोसमाची आतुरतेने वाट पाहत आहे. क्लबला यशस्वी बनवण्यासाठी मला योगदान द्यायचं आहे, अशी प्रतिक्रिया चेतेश्वर पुजाराने दिली आहे. 34 वर्षांचा चेतेश्वर पुजारा याआधीही काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळला आहे, पण यंदा चांगली कामगिरी करून टीम इंडियात (Team India) पुनरागमन करण्यासाठी पुजारा उत्सुक असेल. पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 374 इनिंगमध्ये 51 च्या सरासरीने 16,948 रन केले आहेत, यात 50 शतकं आणि 70 अर्धशतकांचा समावेश आहे. 352 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. पुजारा भारताकडून 95 टेस्ट खेळला, यात त्याने 6,713 रन केले, ज्यात 18 शतकं आणि 32 अर्धशतकं आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pujara
  • First Published :
जाहिरात
जाहिरात