बेगूसराय, 30 मे : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीसह (MS Dhoni) 8 जणांविरोधात बेगूसरायच्या कोर्टात केस करण्यात आली आहे. बेगूसरायमधल्या एसके इंटरप्राईजेजचे प्रोप्रायटर नीरज कुमार यांनी ही केस दाखल केली आहे. हे प्रकरण कृषी खत उत्पादक कंपनीशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. एसके इंटरप्राईजेजचे प्रोप्रायटर नीरज कुमार निराला यांच्या मते न्यू उपज वर्धक इंडिया लिमिटेडने 30 लाख रुपयांपेक्षा जास्तचा उत्पाद करार त्यांच्या एजन्सीसोबत केला होता, नंतर याची डिलिव्हरही करण्यात आली. उत्पादनाच्या विक्रीच्या क्रमात कंपनीने आपल्याला सहकार्य केलं नाही, ज्यामुळे जास्त प्रमाणात खत शिल्लक राहिलं, असा आरोप नीरज कुमार यांनी केला. कंपनीने उरलेलं खत परत घेतलं आणि त्याऐवजी 30 लाख रुपयांचा चेकही आपल्याला दिला. हा चेक आपण बँकेत टाकला पण तो बाऊन्स झाला, याची कायदेशीर नोटीस कंपनीला देण्यात आली, असं नीरज कुमार म्हणाले. नोटीस दिल्यानंतरही कंपनीने कोणंतही उत्तर दिलं नाही, तेव्हा नीरज कुमार यांनी कंपनीचे सीईओ राजेश आर्य यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात केस दाखल केली. या खताची टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने जाहिरात केली होती, त्यामुळे नीरज कुमारने धोनीविरोधातही खटला दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी 28 जून रोजी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.