मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /महिला बॉक्सरनं प्रतिस्पर्धी बॉक्सरवर केला 236 पंचेसचा मारा, चेहरा ओळखणंही झालं कठीण

महिला बॉक्सरनं प्रतिस्पर्धी बॉक्सरवर केला 236 पंचेसचा मारा, चेहरा ओळखणंही झालं कठीण

Miriam Gutierrez (left) and Amanda Serrano during the fight

Miriam Gutierrez (left) and Amanda Serrano during the fight

अमांडा सेरानोनं(Amanda Serrano ) एका बॉक्सिंग मॅचमध्ये आपली प्रतिस्पर्धी मिरियम गुटेरेझच्या (Miriam Gutierrez) चेहऱ्यावर, 20 मिनिटांच्या सामन्यात एकूण 236 ठोसे (punches) लगावले आहेत.

    नवी दिल्ली, 21 डिसेंंबर: पोर्टो रिकोची नागरिक आणि प्रोफेशनल बॉक्सर (Professional Boxer) व रेसलर असलेल्या अमांडा सेरानोची (Amanda Serrano), महिला बॉक्सिंगमध्ये (Women Boxing) कमालीची दहशत आहे. एक बॉक्सर म्हणून तिनं सप्टेंबर 2019 पासून डब्लूबीओ (WBO) आणि डब्ल्यूबीसी (WBC) या स्पर्धांची विजेतेपदं जिंकली आहेत. वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये सर्वाधिक बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तिच्या नावे आहे. आपल्या धडाकेबाज खेळामुळे अमांडा आता पुन्हा चर्चेत आली आहे.

    अमांडा सेरानोनं(Amanda Serrano ) एका बॉक्सिंग मॅचमध्ये आपली प्रतिस्पर्धी मिरियम गुटेरेझच्या (Miriam Gutierrez) चेहऱ्यावर, 20 मिनिटांच्या सामन्यात एकूण 236 ठोसे (punches) लगावले आहेत. यामुळे मिरीयमचा पूर्ण चेहरा सजून विद्रूप झाला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडायेथील ऐमेली अरीनामध्ये झालेल्या युनिफाइड फेदरवेट वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत ही घटना घडली. मिरर डॉट को डॉट यूके या बेवसाईटनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    पहिल्या फेरीत अमांडानं गुटेरेझच्या चेहऱ्यावर 37 पंच मारले होते. त्यामुळे पहिल्या फेरीनंतरच गुटेरेझचा चेहरा भयानक सुजला होता. शनिवारी (18 डिसेंबर 2021) मॅडिसन स्क्वेअर गार्डन (Madison Square Garden) येथे झालेल्या या लढतीमध्ये अमांडानं गुटेरेझला अजिबात वर तोंड काढण्याची संधी दिली नाही. सलग 10 राऊंड जिंकून तिनं मॅच आपल्या खिश्यात टाकली. आपण ही मॅच जिंकली तरच आपल्याला पुढील वर्षी होणाऱ्या महिला बॉक्सिंग इतिहासातील सर्वात मोठ्या लढतीत केटी टेलरशी (Katie Taylor) लढण्याची संधी मिळेल, ही गोष्ट अमांडाला माहिती होती. भविष्यात केटी टेलरशी लढण्याची गोष्ट डोक्यात ठेवूनच ती गुटेरेझविरुद्धच्या सामन्यात उतरली होती. विशेष म्हणजे, मिरियम गुटेरेझला यापूर्वी केटी टेलरकडूनही पराभव पत्करावा लागलेला आहे.

    बॉक्सिंग रिंगमध्ये एकमेकींना कडवी झुंज देणाऱ्या मिरीयम गुटेरेझ आणि अमांडानं मॅच संपल्यानंतर एकमेकींसोबत फोटोसाठी पोज दिल्या. अमांडानं आपल्या प्रतिस्पर्धीची मुक्त कंठानं स्तुती (Amanda Praises Miriam Gutierrez) देखील केली. गुटेरेझ अतिशय प्रतिभान खेळाडू आहे. गेल्याच महिन्यात तिनं चांगला खेळ दाखवून काही मॅचेस जिंकल्या होत्या. हा तिच्यासाठी लाजिरवाणा पराभव नक्कीच नाही. कारण, आम्ही एकमेकींविरुद्ध आपली पूर्ण ताकद लावली होती. आता जरी तिचा चेहरा विद्रूप झाला असला तरी, काही दिवसांत तो पूर्ववत होईल, असं अमांडा म्हणाली.

    आपल्या खेळाच्या स्ट्रॅटेजीबद्दलही अमांडानं माहिती दिली. मी रिंगमध्ये उतरली की, समोर कोण आहे याची काळजी करत नाही. या मॅचमध्येदेखील मी हेच केलं, असं अमांडानं सांगितलं. शनिवारी झालेल्या मॅचमध्ये अमांडानं सुरुवातीपासूनच वर्चस्व राखलं होतं. तिनं बॉडी शॉट्स (Body shots) आणि हेड शॉट्सचा (Head shots) सलग मारा करून गुटेरेझला हैराण करून सोडलं होतं.

    पुढील वर्षी केटी टेलर आणि एडी हर्नविरुद्ध होणाऱ्या लढतींसाठी अमांडाला तयार करण्यासाठी तिचा प्रमोटर जॅक पॉल जोरदार प्रयत्न करत आहे. पुढील वर्षी लाईटवेट गटातील सर्व मार्बल्ससाठी अमांडा सेरानोला आता टेलरचा सामना करावा लागणार आहे.

    First published:
    top videos

      Tags: Boxing champion