मेलबर्न, 14 जानेवारी : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बीग बॅश लीगमध्ये यंदा अनेक नाट्यमय घटना घडल्या आहेत. याआधी सीमारेषेबाहेर चेंडू हवेत पकडून पुन्हा आत उडी मारून घेतलेल्या झेलमुळे वाद निर्माण झाला होता. आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चा सुरू झाली आहे. शनिवारी मेलबर्नच्या डॉकलँडस् स्टेडियममध्ये सामना झाला. पावसामुळे बंद स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात बाउंड्रीबाहेर न जाताही षटकार देण्यात आला. मेलबर्न रेनेगेड्स आणि मेलबर्न स्टार्समध्ये बीबीएलमधला ४१ वा सामना झाला. या सामन्यात जो क्लार्क आणि ब्यू बेबस्टर यांनी मारलेला चेंडू छताला लागला. तेव्हा दोघांनाही यावर षटकार दिला गेला. मात्र दोन्ही वेळा चेंडूंची दिशा पाहता तो बाउंड्रीच्या आतच पडत असल्याचं दिसत होतं. मात्र पंचांनी कोणताही विचार न करता दोन्ही वेळा षटकार दिला. त्यावेळी फिल्डर्सनाही आश्चर्य वाटलं नव्हतं.
हेही वाचा : ICC U19 Womens World Cup : टीम इंडियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ प्रतिस्पर्धी संघांनी यावर आक्षेप घेतला नाही कारण आधीच याबाबत नियम तयार करण्यात आला होता. चेंडू बंद स्टेडियमच्या छताला लागल्यास षटकार दिला जाईल. तेव्हा तो कोणत्या दिशेला आहे, मैदानात पडू शकतो की बाहेर ही बाब लक्षात घेतली जाणार नाही. त्यामुळे एकाच सामन्यात दोन वेळा जो क्लार्क आणि ब्यू बेबस्टर यांनी असे फटके मारलेले चेंडू छताला लागला आणि पंचांनी षटकार दिला. पंचांनी षटकार दिलेल्या मेलबर्न स्टार्सला मात्र याचा फायदा होऊ शकला नाही. मेलबर्न रेनेगेड्सने सामना ६ धावांनी जिंकला. रेनेगेड्सने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६२ धावा केल्या होत्या. तर मेलबर्नने स्टार्सने २० षटकात ७ बाद १५६ धावांपर्यंत मजल मारली.