जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / इंग्लंडला मिळाला नवा टेस्ट कॅप्टन, भारताला चॅम्पियन बनवणारा दिग्गज होणार कोच!

इंग्लंडला मिळाला नवा टेस्ट कॅप्टन, भारताला चॅम्पियन बनवणारा दिग्गज होणार कोच!

इंग्लंडला मिळाला नवा टेस्ट कॅप्टन, भारताला चॅम्पियन बनवणारा दिग्गज होणार कोच!

इंग्लंडचा नवा टेस्ट कर्णधार (England Test Team) जवळपास निश्चित झाला आहे. ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) ही जबाबदारी पार पाडायला तयार झाला आहे. काही दिवसांपूर्वी जो रूटने (Joe Root) टेस्ट टीमची कॅप्टन्सी सोडली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 एप्रिल : इंग्लंडचा नवा टेस्ट कर्णधार (England Test Team) जवळपास निश्चित झाला आहे. ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) ही जबाबदारी पार पाडायला तयार झाला आहे. काही दिवसांपूर्वी जो रूटने (Joe Root) टेस्ट टीमची कॅप्टन्सी सोडली होती. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे नवे डायरेक्टर रॉब की यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर स्टोक्सने कर्णधारपद स्वीकारायला होकार दिला आहे, त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) लवकरच नव्या टेस्ट कर्णधाराची घोषणा करू शकते. रॉब की यांच्यासोबत झालेल्या बैठकीत स्टोक्सने काही अटीही ठेवल्याची माहिती आहे. दोन सीनियर बॉलर जेम्स अंडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) यांना पुन्हा टीममध्ये घेण्याची इच्छा स्टोक्सने बोलून दाखवली आहे. ऍशेस सीरिजमध्ये अंडरसन आणि ब्रॉड यांना खेळण्याची संधी कमी मिळाली. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीही दोघांना बाहेर केलं गेलं. इंग्लंडचा ऍशेसमध्ये दारूण पराभव झाला होता. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार बेन स्टोक्स इंग्लंडचा नवा टेस्ट कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे. याशिवाय टेस्ट टीमसाठी गॅरी कर्स्टन (Garry Kirsten) आणि सायमन कॅटिच (Simon Katich) यांचं नाव आघाडीवर आहे. कर्स्टन कोच असतानाच भारताने 2011 सालचा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टेस्ट आणि लिमिटेड ओव्हर क्रिकेट या दोन्हींच्या कोचसाठी वेगवेगळी जाहिरात दिली आहे. स्टोक्सला टेस्ट टीमचं नेतृत्व करण्याचा अनुभव नाही, रूट कर्णधार असताना स्टोक्स टीमचा उपकर्णधार होता. मागच्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या लिमिटेड ओव्हरच्या सीरिजमध्ये बेन स्टोक्सला इंग्लंडचा कर्णधार करण्यात आलं. टीमचे बहुतेक खेळाडू कोरोनाग्रस्त असल्यामुळे खेळण्यासाठी उपलब्ध नव्हते. या सीरिजमध्ये इंग्लंडचा 3-0 ने विजय झाला होता. स्टोक्सने 2020 साली वेस्ट इंडिजविरुद्ध एक टेस्ट मॅचचं नेतृत्व करण्याची संधीही मिळाली होती, पण या टेस्टमध्ये इंग्लंडचा पराभव झाला होता. जूनपर्यंत फिट होणार बेन स्टोक्स सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे, पण जून महिन्यान न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी स्टोक्स फिट होण्याची शक्यता आहे. स्टोक्सला कर्णधार केलं तरी इंग्लंड क्रिकेट बोर्डापुढे टेस्ट टीमचा उपकर्णधार कोण, याची निवड करणं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. झॅक क्रॉलेने वेस्ट इंडिजमध्ये त्याच्या नेतृत्वाने प्रभावित केलं, पण उपकर्णधार होण्याआधी त्याला बॅटर म्हणून स्वत:ला सिद्ध करणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात