लंडन, 6 मे : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा आनंद साजरा केला. स्टोक्सने काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 मध्ये डरहॅमकडून वूस्टरशायरविरुद्ध खेळताना अवघ्या 64 चेंडूत शतक झळकावले. यादरम्यान त्याने डावखुरा फिरकी गोलंदाज जोश बेकरच्या एका षटकात 34 धावा काढत शानदार शतक साजरं केलं. बेकरचा त्या षटकातील शेवटचा चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ पडला, त्यामुळे स्टोक्सला एका षटकात सहा षटकार मारणे शक्य झाले नाही. डावाच्या 117व्या षटकात हा चमत्कार घडवला. त्यावेळी बेन स्टोक्स 59 चेंडूत 70 धावा केल्यानंतर फलंदाजी करत होता आणि त्याने फिरकी गोलंदाजावर सलग पाच षटकार ठोकले. ओव्हरचा पहिला चेंडू लाँगऑन वरुन गेला, तर पुढचा चेंडू स्टोक्सने डीप मिड-विकेटवर मारला. त्यानंतर पुढच्या तीन चेंडूंवरही स्टोक्सने असाच प्रहार केला. अखेर बेन स्टोक्स 88 चेंडूत 161 धावा करून बाद झाला. स्टोक्सने आपल्या खेळीत 17 षटकार आणि 8 चौकार लगावले. स्टोक्सच्या या खेळीमुळे डरहमने पहिला डाव 580/6 वर घोषित केला. स्टोक्सच्या या झंझावाती खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
6️⃣ 6️⃣ 6️⃣ 6️⃣ 6️⃣ 4️⃣
— County Championship (@CountyChamp) May 6, 2022
What. An. Over.
34 from six balls for @benstokes38 as he reaches a 64 ball century 👏#LVCountyChamp pic.twitter.com/yqPod8Pchm
2013 मध्ये कसोटी पदार्पण 31 वर्षीय स्टोक्सला गेल्या महिन्यात इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. खराब कामगिरीनंतर संघाचे कर्णधारपद सोडलेल्या अनुभवी फलंदाज जो रूटची जागा बेन स्टोक्सने घेतली आहे. बेन स्टोक्सने 2013 मध्ये कसोटी पदार्पण केले. जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान बेन स्टोक्स पूर्णवेळ कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. बेन स्टोक्सला घरच्या हंगामात सात कसोटी खेळायच्या आहेत, त्यातली एक भारताविरुद्धच्या आहे.
INCREDIBLE.
— County Championship (@CountyChamp) May 6, 2022
Sit back and enjoy all Ben Stokes' boundaries 💪#LVCountyChamp pic.twitter.com/mGg0olouwG
डाव्या हाताने बॅटींग आणि उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या स्टोक्सने आतापर्यंत 79 सामन्यात 5061 धावा करत 174 बळी घेतले आहेत. 2017 मध्ये त्याची कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि रूटच्या अनुपस्थितीतही त्याने संघाचे नेतृत्व केले आहे.