मुंबई, 13 मार्च : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याच्या सोबत एक विचित्र घटना घडली आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका पारपडल्यानंतर बेन स्टोक्स आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी सुट्टीवर गेला असताना रेल्वे स्टेशनवर त्याची कपड्यांची बॅग चोरीला गेली आहे. बॅग चोरीला गेल्याची बातमी स्वतः बेन स्टोक्सने आपल्या ट्विटरवर पोस्ट करून याविषयी संताप व्यक्त केला. बॅग चोरीला गेल्याने बेन स्टोक्सवर अतिशय वाईट वेळी आली आहे.
झालं असं की बेन स्टोक्स कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी काही दिवस सुट्टीवर गेला होता. यावेळी रेल्वे स्टेशनवर एका चोरट्याने स्टोक्सची फसवणूक करून त्याची बॅग चोरून नेली. बॅग चोरीला गेल्यानंतर स्टोक्सने ट्विट करून याबाबत नाराजी व्यक्त केली. त्याने लिहिले, "ज्याने किंग्स क्रॉस रेल्वे स्टेशनवर माझी बॅग चोरली. मला वाटते की, माझे कपडे तुम्हाला खूप मोठे होतील." यासह त्याने राग व्यक्त करणारे इमोजी देखील टाकले.
To who ever stole my bag at King’s Cross train station. I hope my clothes are to big for you ya absolute ****** 😡
— Ben Stokes (@benstokes38) March 12, 2023
बेन स्टोक्सच्या कपड्यांची बॅग चोरीला गेल्याची बातमी इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरली. यानंतर सोशल मीडियावर बेन स्टोक्सचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात स्टोक्स अंडरविअरवर दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोवर नेटकरी मजेदार कमेंट करत असून कपड्यांची बॅग चोरीला गेल्याने स्टोक्सवर अंडरविअरवर फिरण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ben stokes, Cricket, Cricket news, England