मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धोनीला वगळल्यानंतर चाहते झाले भावूक, अखेर BCCIला द्यावं लागलं कारण

धोनीला वगळल्यानंतर चाहते झाले भावूक, अखेर BCCIला द्यावं लागलं कारण

बीसीसीआयच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या वार्षिक करारात धोनीला वगळण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या वार्षिक करारात धोनीला वगळण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या वार्षिक करारात धोनीला वगळण्यात आले आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 16 जानेवारी : बीसीसीआयच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या वार्षिक करारात धोनीला वगळण्यात आले आहे. त्यामुळं धोनीवर निवृत्ती घेण्यासाठी बीसीसीआय दबाव तर टाकत नाही आहे ना, असा सवाल धोनीच्या चाहत्यांना पडला आहे. धोनीला या करारातून वगळल्यानंतर चाहत्यांनी ट्विटरवर #ThankYouDhoni ट्रेंड करण्यास सुरुवात केली. दरम्यान यानंतर अखेर बीसीसीआयनं याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

एमएस धोनीला करारातून वगळल्यानंतर बीसीसीआयनं वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या माहितीत, धोनीशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. बीटीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना, 'मी सांगू इच्छितो की बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी धोनीशी संवाद साधला आणि त्याच्याबरोबर या कराराविषयी चर्चा केली. धोनीनं सप्टेंबर 2019 पासून आपण कोणताही सामना खेळलेला नाही. त्यामुळं त्याला या करारातून वगळण्यात आले आहे’, असे सांगितले.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले आहे की, 'धोनीशी कोण बोलले आहे हे विचारू नका. मोठी गोष्ट म्हणजे धोनीसारख्या महान व्यक्तीच्या खेळाडूला करारातून काढून टाकण्यापूर्वी बोलणे आवश्यक आहे. त्यांना योग्य सांगितले गेले आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला’. असे असले तरी, धोनीला या करारातून वगळल्यानंतर धोनीचे चाहते भावुक झाले आहेत. ट्विटरवर धोनीच्या चाहत्यांनी #ThankYouDhoni असे ट्रेंड केले आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. एवढेच नाही तर धोनीनं घरेलू मालिकांमध्येही भाग घेतला नाही. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार की नाही याबाबत शंका असताना, जानेवारीपर्यंत निवृत्तीबाबत विचारू नका, असे संकेत धोनीनं दिले होते.

कर्णधार कोहली A श्रेणीत सामील

सर्वात उंच ग्रेड असलेल्या Aमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर वनचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंना करारानुसार सात कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

ग्रेड Aमध्ये ऋषभ पंतचा समावेश

बीसीसीआयच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या या करारात ग्रेड Aमध्ये एकूण 11 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत असेलल्या खेळाडूंना दरवर्षी 5 कोटी रुपये दिले जातील. यामध्ये आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी या गोलंदाजांचा तर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, के. एल. राहुल, शिखर धवन आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, ग्रेड बीमध्ये ऋद्धिमान साहा (Wriddhiman Saha), उमेश यादव (Umesh Yadav), यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि मयंक अग्रवाल यांचे नाव तीन कोटींच्या यादीत टाकण्यात आले आहे.

दीपक चाहर आणि नवदीप सैनी पहिल्यांदा झाले करारात सामिल

ग्रेड Cमध्ये आठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांना वर्षाला 1 कोटी रुपये देण्यात येतात. यात केदार जाधव, मनीष पांडे, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर यांच्याशिवाय दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे नाव सामिल करण्यात आले आहे.

First published:

Tags: Cricket, Mahendra singh dhoni