Home /News /sport /

The Hundred साठी BCCI ने दिली चार खेळाडूंना परवानगी

The Hundred साठी BCCI ने दिली चार खेळाडूंना परवानगी

इंग्लंडमध्ये जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या द हंड्रेड ( The Hundred) या स्पर्धेसाठी बीसीसीआयने 4 खेळाडूंना परवानगी दिली आहे. इएसपीएन क्रिकइन्फोने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बीसीसीआयने (BCCI) इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ECB) या खेळाडूंचं ना हरकत प्रमाणपत्र पाठवलं आहे

पुढे वाचा ...
    मुंबई, 5 मे : इंग्लंडमध्ये जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या द हंड्रेड ( The Hundred) या स्पर्धेसाठी बीसीसीआयने 4 खेळाडूंना परवानगी दिली आहे. इएसपीएन क्रिकइन्फोने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बीसीसीआयने (BCCI) इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ECB) या खेळाडूंचं ना हरकत प्रमाणपत्र पाठवलं आहे, त्यामुळे लवकरच द हंड्रेड टीमकडून या खेळाडूंची घोषणा होईल. हरमनप्री कौर (Harmanpreet Kaur), स्मृती मंधाना (Smriti Mandhana), जेमिमाह रॉड्रीक्स (Jemimah Rodrigues) आणि दीप्ती शर्मा (Deepti Sharma) या भारतीय खेळाडूंची द हंड्रेड स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आणि बीसीसीआयनेही याला मान्यता दिली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांची स्थानिक टी-20 स्पर्धा असलेली सुपर लीग रद्द करून द हंड्रेड खेळवण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला टीम इंग्लंड दौऱ्यावर (India vs England) जाणार आहे. या दौऱ्यातली एकमेव टेस्ट 16 जूनपासून सुरू होणार आहे, यानंतर तीन वनडे मॅचची सीरिज आणि तीन टी-20 मॅचची सीरिज होईल. तिसरी आणि अंतिम टी-20 मॅच 15 जुलैला होईल, यानंतर या चौघी इंग्लंडमध्येच द हंड्रेड खेळण्यासाठी थांबतील. 24 परदेशी खेळाडूंपैकी 20 खेळाडूंसोबत आधीच करार झाला आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी ही द हंड्रेडसाठी करारबद्ध झालेली 11वी ऑस्ट्रेलियन खेळाडू होती. सदर्न ब्रेव्ह, लंडन स्पिरीट, मॅनचेस्टर ओरिजिनल्स आणि नॉर्थन सुपरचेंजर्स या 4 टीम द हंड्रेड स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पुरुष खेळाडूंनाही मागणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयपीएलच्या टीम मालकांनाही द हंडरेडमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. द टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार आयपीएलच्या सगळ्या 8 टीमना प्रत्येकी 25 टक्के भागीदारी द्यायची ऑफर देण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांनीही या ऑफरमध्ये रस दाखवला आहे. तसंच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने द हंडरेडसाठी विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) जर सहभागी झाले तर टीव्ही राईट्स द्यायचीही ऑफर दिली आहे. पण बीसीसीआयने (BCCI) याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. द हंड्रेड म्हणजे काय? द हंड्रेड म्हणजेच 100 बॉलची एक इनिंग असलेली ही स्पर्धा जुलै-ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेत आयपीएलप्रमाणेच 8 फ्रॅन्चायजी असतील. प्रत्येक फ्रॅन्चायजीमध्ये एक महिला आणि एक पुरुष टीम असेल. 100 बॉलच्या या स्पर्धेत 10 बॉलची एक ओव्हर असेल. कर्णधाराला वाटलं तर तो दोन बॉलरकडून 5-5ओव्हर टाकू शकेल. याआधी ही स्पर्धा 2020 साली खेळवली जाणार होती, पण कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा थांबवण्यात आली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, England, Smruti mandhana

    पुढील बातम्या