मेलबर्न, 12 जानेवारी : क्रिकेटमध्ये अनेकवेळा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी बघायला मिळतात, ज्यावर खेळाडू आणि प्रेक्षकांचाही विश्वास बसत नाही. अफगाणिस्तानचा दिग्गज लेग स्पिनर राशिद खान (Rashid Khan) याच्याबाबतीतही असाच प्रकार घडला आहे. बिग बॅश लीगमध्ये (BBL) खेळताना राशिद खानच्याच देशाचा मुजीब उर रहमानने (Mujeeb Ur Rehman) त्याला बोल्ड केलं. इनिंगच्या 17 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला राशिद खानने मुजीबच्या बॉलवर लेग साईडच्या दिशेने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. लेग स्टम्पच्या खूपच बाहेर पडलेला बॉल राशिदच्या बॅटच्या आतल्या बाजूला लागला आणि स्टम्पवर जाऊन आदळला. अशाप्रकारे आऊट झाल्याचं पाहून राशिद खानलाही धक्का बसला. 4 बॉलमध्ये 13 रन करून राशिद खान माघारी परतला.
Rashid Khan can't believe he's been bowled by this delivery 😬pic.twitter.com/UvtX6gFEIE
— Wisden (@WisdenCricket) January 12, 2022
राशिद खान बॅटिंगमध्ये फार काही करू शकला नसला तरी त्याने बॉलिंगमध्ये मात्र धमाकेदार कामगिरी केली. आपल्या 300 व्या टी-20 मॅचमध्ये राशिदने फक्त 17 बॉलमध्ये 6 विकेट घेऊन विरोधी टीमला 90 रनवर ऑल आऊट केलं. ज्यामुळे ऍडलेड स्ट्रायकर्सनी ब्रिस्बेन हीटला (Brisbane Heat vs Adelaide Strikers) 71 रननी पराभूत केलं. राशिद खानने टी-20 करियरमध्ये 420 विकेट घेतल्या आहेत. या सामन्यात राशिदने 5 खेळाडूंना शून्य रनवर आऊट केलं. राशिद खानला इनिंगच्या पहिल्या 7 बॉलवर एकही विकेट मिळाली नाही. मग त्याने 8व्या बॉलला सॅम हिजलेटला शून्य रनवर आऊट केलं. यानंतर पुढच्याच बॉलला त्याने जॅक लेहमनला शून्य रनवरच बोल्ड केलं. त्यामुळे राशिद खान हॅट्रिकवर होता, पण त्याला यात यश आलं नाही. तिसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर त्याने विलला शून्य रनवरच पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला मॅथ्यू एक रनवर आणि तिसऱ्या बॉलला मुजीब शून्य रनवर आऊट झाले. यानंतरही राशिद हॅट्रिकवर होता, पण यावेळीही त्याला यश मिळालं नाही. शेवटच्या बॉलवर राशिदने लियामला शून्य रनवरच आऊट केलं, ज्यामुळे ब्रिस्बेनची इनिंग 90 रनवरच संपली.
For your viewing pleasure, all six of @rashidkhan_19's historic wickets in his 300th T20 match!
— KFC Big Bash League (@BBL) January 12, 2022
He leaves #BBL11 in the lead of the BKT Golden Arm standings! 👑 pic.twitter.com/Zct68mOoxl
करियरची सर्वोत्तम कामगिरी राशिदची टी-20 मधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 6 विकेट घेतल्या. राशिदने चौथ्यांदा 5 विकेट घेण्याचा विक्रम केला, तर 7 वेळा त्याला 4 विकेट घेण्यात यश आलं आहे. आतापर्यंत 300 टी-20 मॅचमध्ये त्याने 17 च्या सरासरीने आणि 6.35 च्या इकोनॉमी रेटने 420 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने एका अर्धशतकासह 1366 रन केल्या. नाबाद 56 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. या सामन्यात ऍडलेड स्ट्रायकर्सनी पहिले बॅटिंग करत 4 विकेट गमावून 161 रन केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रिस्बेनचा 15 ओव्हरमध्ये 90 रनवर ऑल आऊट झाला. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये राशिद सनरायजर्स हैदराबादकडून खेळला होता, यावेळी मात्र तो नव्या टीकडून खेळणार आहे.

)







