जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / विराटच्या सहकाऱ्याला कोरोनाची लागण, मॅच सुरू व्हायच्या काही वेळ आधीच आला पॉझिटिव्ह

विराटच्या सहकाऱ्याला कोरोनाची लागण, मॅच सुरू व्हायच्या काही वेळ आधीच आला पॉझिटिव्ह

विराटच्या सहकाऱ्याला कोरोनाची लागण, मॅच सुरू व्हायच्या काही वेळ आधीच आला पॉझिटिव्ह

ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर आणि बिग बॅश लीगमधला (BBL) मेलबर्न स्टार्सचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 जानेवारी : ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर आणि बिग बॅश लीगमधला (BBL) मेलबर्न स्टार्सचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. याचसह तो कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेला क्लबचा 13 वा सदस्य बनला आहे. मॅक्सवेलची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची आयपीएल टीम आरसीबीने (RCB) मॅक्सवेलला लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना केली आहे. बीबीएलमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. मेलबर्न कोरोना रुग्ण सापडणारा पाचवा क्लब ठरला आहे. मेलबर्न स्टार्सचा ग्लेन मॅक्सवेल मेलबर्न रेनेगेड्सविरुद्धच्या सामन्याआधी झालेल्या रॅपिड एन्टीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला. क्रिकेट.कॉम.एयूने दिलेल्या माहितीनुसार मॅक्सवेलच्या आरटी-पीसीआर टेस्टच्या निकालाची वाट पाहत आहोत. यानंतर लगेचच मेलबर्न रेनेगेड्सनेही आपल्या टीमचा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्याचीही माहिती दिली. यामुळे रेनेगेड्सना त्यांचं सराव सत्र रद्द करावं लागलं आहे. मेलबर्न स्टार्स आणि मेलबर्न रेनेगेड्सशिवाय आणखी तीन बीबीएल टीमनी मंगळवारी कोरोना रुग्णांची पुष्टी केली आहे. मंगळवारी होणारी सिडनी सिक्सर्स आणि ब्रिस्बेन हिट यांच्यातली मॅच कोरोनामुळे होऊ शकली नाही. ब्रिस्बेन हिटच्या टीममध्ये आतापर्यंत 12 रुग्ण सापडले आहेत. एडम झम्पा, मार्कस स्टॉयनिस आणि नॅथन कुल्टर नाईल यांच्यासह स्टार्सचे प्रमुख खेळाडू 7 दिवसांना अनिवार्य क्वारंटाईन संपवून 7 जानेवारीला एडलेट स्ट्रायकर्सविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात