मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /बाप दिग्गज फास्ट बॉलर, पोरगा बनला T20 स्टार, ठोकलं वादळी शतक!

बाप दिग्गज फास्ट बॉलर, पोरगा बनला T20 स्टार, ठोकलं वादळी शतक!

बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) सोमवारी प्रेक्षकांना मोठं शतक पाहायलाम मिळालं. बेन मॅकडरमेटने (Ben Mcdermott) धमाकेदार खेळी करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला. 27 वर्षाच्या बेनने टी-20 क्रिकेटमधलं आपलं पहिलंच शतक झळकावलं.

मेलबर्न, 27 डिसेंबर : बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) सोमवारी प्रेक्षकांना मोठं शतक पाहायलाम मिळालं. बेन मॅकडरमेटने (Ben Mcdermott) धमाकेदार खेळी करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला. 27 वर्षाच्या बेनने टी-20 क्रिकेटमधलं आपलं पहिलंच शतक झळकावलं. होबार्ट हरिकेन्सविरुद्धच्या या सामन्यात ऍडलेड स्ट्रायकर्सने (Hobart Hurricanes vs Adelaide Strikers) पहिले बॅटिंग करत 175 रन केले, पण बेन मॅकडरमेटच्या शतकामुळे होबार्टने हा सामना 9 बॉल शिल्लक असतानाच जिंकला.

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या होबार्टची सुरुवात चांगली झाली नाही. टीमने दुसऱ्याच ओव्हरमध्ये कर्णधार मॅथ्यू वेडची 6 रनवर विकेट गमावली. तरीही मॅकडरमेटने आक्रमण सुरूच ठेवंल. त्याने दुसऱ्या विकेटसाठी डी आर्सी शॉर्टसोबत 81 रनची पार्टनरशीप केली. शॉर्टने 32 बॉलमध्ये 37 रन केले, तर ब्रुक 6 रन करून आऊट झाला. मॅकडरमेटने 60 बॉलमध्ये नाबाद 110 रन करत ऍडलेडचा विजय पक्का केला. मॅकडरमेटच्या या खेळीमध्ये 12 फोर आणि 5 सिक्स होत्या, म्हणजेच त्याने 78 रन बाऊंड्रीच्या मदतीनेच केल्या. टीमने या आव्हानाचा पाठलाग 18.3 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून केला.

याआधी ऍडलेडने पहिले बॅटिंग करत 5 विकेट गमावून 175 रन केले. ओपनर बॅटर जॅक वेदरहेल्डने 43 बॉलमध्ये 51 रन केले, ज्यात 6 फोर होत्या. अखेरच्या काही ओव्हरमध्ये मॅट रेन्शॉने 41 बॉलमध्ये 63 रन करून स्कोअर 170 च्या पार नेला. रेन्शॉने 9 फोर मारल्या. याशिवाय थॉमस केलीने 18 बॉलमध्ये 28 रन केले. फास्ट बॉलर रिले मेरेडिथने 37 रन देऊन 3 विकेट मिळवल्या.

बेन मॅकडरमेटने टी-20 करियरमध्ये 81 मॅचच्या 76 इनिंग खेळून 30 च्या सरासरीने 1,842 रन केल्या, यात एक शतक आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. मॅकडरमेट ऑस्ट्रेलियाकडून 2 वनडे आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय खेळला आहे. बेनचे वडील क्रेग मॅकडरमेट ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फास्ट बॉलर होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून खेळताना 71 टेस्टमध्ये 291 आणि 138 वनडेमध्ये 203 विकेट मिळवल्या. याशिवाय क्रेग यांनी 174 प्रथम श्रेणीमध्ये 677 विकेटही घेतल्या.

First published:
top videos

    Tags: T20 league