मुंबई, 12 मार्च : बांगलादेशने मायदेशात इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या टी 20 मालिकेत इंग्लंडच्या संघाला पराभवाची धूळ चारली आहे. टी 20 मालिकेतील दुसरा सामना 4 विकेट्सने जिंकून बांगलादेशने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. यासह इंग्लंड सोबत कोणत्याही फॉरमॅटमधील बांगलादेशचा हा पहिलाच द्विपक्षीय मालिका विजय ठरला.
ढाका येथे बांगलादेश विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना पारपडला असून सुरुवातीला नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या इंग्लड संघाने सुरुवातीपासूनच बांग्लादेशच्या गोलंदाजांनासमोर गुडघे टेकले. इंग्लंडकडून बन डकेटने सर्वाधिक 28 धावांची खेळी खेळली. तर इंग्लंडचे सहा फलंदाज दहा धावांचा आकडाही गाठता आला नाही. अखेर इंग्लंडने बांगलादेश समोर विजयासाठी 118 धावांचे आव्हान ठेवले.
इंग्लंडने दिलेले विजयाचे आव्हान पार करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. परंतु त्यानंतर फलंदाजांनी चांगली खेळी करून इंग्लडने दिलेले आव्हान 18.5 षटकांत 4 विकेट्स राखून पूर्ण केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh cricket team, Cricket, Cricket news, England