फक्त भारतातच असं होऊ शकतं, अयोध्या निकालावर भारतीय क्रिकेटपटूचं ट्विट

फक्त भारतातच असं होऊ शकतं, अयोध्या निकालावर भारतीय क्रिकेटपटूचं ट्विट

अयोध्या निकालावर भारताच्या माजी क्रिकेटपटूने दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अयोध्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्विटमधून भारतातील विविधता आणि विचारांमध्ये भिन्नता असूनही दिसणाऱ्या एकतेचं कौतुक केलं आहे. त्याची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. मोहम्मद कैफशिवाय क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी या निर्णयाचं स्वागत केलं.

अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर शनिवारी निकाल दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्याायधीशांच्या घटनापीठाने या प्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला. यामध्ये वादग्रस्त जागेचा निर्णय अत्यंत संवेदनशील असा होता. शिया वक्फ बोर्डाचा आणि निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने या जागेचा मालकी हक्क रामलला न्यासाचा असल्याचा निर्णय दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई या घटनापीठाचे अध्यक्ष असून त्यांच्याशिवाय न्यायाधीश एसए बोबडे, न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश एस अब्दुल नजीर, न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा समावेश होता.

मोहम्मद कैफने म्हटलं की फक्त भारतातच असं होऊ शकतं. जिथं एक न्यायाधीश अब्दुल नजीर या निर्णय प्रक्रियेत होते. याशिवाय केके मोहम्मद यांनी महत्त्वपूर्ण दस्ताऐवज पुरवले. भारताची कल्पना ही सर्वांना सामावून घेणाऱ्या विचारधारेपेक्षा मोठी आहे. सर्वजण आनंदी राहू देत, शांती, प्रेम आणि सद्भाव यांची प्रार्थना करतो.

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीला 5 ऑगस्टला सुरुवात झाली होती. त्यानंतर या प्रकरणावर नियमित सुनावणी झाली आहे. 40 दिवस चाललेल्या या सुनावणीनंतर 17 ऑक्टोंबरला निर्णय राखून ठेवण्यात आला होता. या सुनावणीवेळी मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन आणि इतर वकीलांनी केलेल्या प्रतिवादावरही स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. तसेच भारताच्या पुरातत्व खात्याच्या सर्वेक्षणाच्या रिपोर्टचा आधार घेत असंही सांगितलं की अयोध्येतील मशिद रिकाम्या जागेवर उभारली नव्हती.

अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामजन्मभूमी न्यासाला देण्यात आली असून मुस्लीमांना 5 एकर जमीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ट्रस्ट स्थापन करून राम मंदिर उभारण्याचे आदेश दिले आहेत.

वादग्रस्त जागेवर शिया वक्फ बोर्डाचा मालकी हक्काचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच याठिकाणी असलेलं बांधकाम गैर इस्लामिक होतं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. शिया वक्फ बोर्डाची याचिका पाचही न्यायाधीशांनी फेटाळली. सुन्नी वक्फ बोर्ड आणि राम लाल्ला  विराजमान यांचे दावे निकाली काढले जातील आणि दिलासा दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.

VIDEO :..जर फडणवीसांनी बहुमत सिद्ध केलं नाही? जयंत पाटलांनी वर्तवला पुढचा अंदाज

Published by: Suraj Yadav
First published: November 10, 2019, 8:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading