मुंबई, 19 एप्रिल : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू (Australian Cricketer) रेयान कॅम्पबेल (Ryan Campbell) आयुष्याची लढाई लढतोय. हृदयविकाराचा धक्का लागल्यानंतर कॅम्पबेल सध्या कोमामध्ये आहे. लंडनच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. 50 वर्षांचा कॅम्पबेल काही दिवसांपूर्वी आपल्या मुलांसोबत मैदानात गेला होता. तिकडे त्याच्या छातीत दुखायला लागलं आणि श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, त्यामुळे त्याला मैदानातच झोपावं लागलं. कॅम्पबेलची अवस्था पाहून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याआधी सीपीआर देण्यात आला. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार कॅम्पबेल अजून प्रतिसाद देत नाहीये. 2002 साली त्याने ऑस्ट्रेलियाकडून वनडे मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. यानंतर त्याने 2016 साली हाँगकाँगसाठीही टी-20 पदार्पण केलं. 2016 साली भारतात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये कॅम्पबेल हाँगकाँगकडून खेळला.
Earlier I shared the news that former WA and Australian cricketer and friend of so many Ryan Campbell is in ICU in London after a heart attack on Saturday. He was here in Perth just last week and fit as a fiddle. Please have him, wife Leontina and his kids in your prayers. @6PR
— Gareth Parker (@G_Parker) April 18, 2022
44 वर्ष 30 दिवसांचा असताना पदार्पण कॅम्पबेलने 44 वर्ष आणि 30 दिवसांचा असताना आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याचसोबत तो क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वय असताना पदार्पण करणारा खेळाडू बनला. कॅम्पबेलने 2 वनडेमध्ये 54 रन आणि 3 टी-20 मध्ये 26 रन केले. जानेवारी 2017 साली तो नेदरलँड्स टीमचा कोच झाला.
1995-96 साली कॅम्पबेल वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी एडम गिलख्रिस्टसोबत स्पेशलिस्ट बॅटर म्हणून खेळला. यानंतर गिलख्रिस्टची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड झाली, त्यामुळे कॅम्पबेलने विकेट कीपर म्हणून वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये गिलख्रिस्टची जागा घेतली. यानंतर जानेवारी 2002 साली कॅम्पबेलने न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमधून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याचवर्षी डिसेंबर महिन्यातही तो श्रीलंकेविरुद्ध खेळला, पण ही त्याची ऑस्ट्रेलियासाठीची अखेरची मॅच ठरली. या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने गिलख्रिस्टची जागा घेतली होती. 2012 साली तो हाँगकाँगला गेला.