मुंबई, 16 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ असलेल्या कारवर हल्ला झाल्याची माहिती समोर आल्यानंतर या घटनेवेळचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुंबईत पृथ्वी शॉवर काहींनी हल्ला केल्याची घटना घडली. सेल्फी काढायला नकार दिल्यानं ८ जणांच्या जमावाने कारवर बेसबॉल स्टिकने हल्ला केला. १५ फेब्रुवारीच्या रात्री मुंबईत विलेपार्ले परिसरात हा प्रकार घडला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पृथ्वी शॉ शूटिंग करणाऱ्यांना अडवताना दिसत आहे. मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. पृथ्वी शॉ मित्राच्या कारमध्ये बसला होता. तेव्हा काही जण तिथे पृथ्वी शॉ सोबत सेल्फी घेण्यासाठी आले. मात्र पृथ्वी शॉने नकार दिल्याने रागाच्या भरात जमावाने पृथ्वी शॉ बसलेल्या कारवर हल्ला केला. या प्रकरणी पृथ्वी शॉने ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीय.
क्रिकेटर पृथ्वी शॉसोबत रेस्टॉरंटबाहेर नेमकं काय घडलं? धक्कादायक Video आला समोर..#PrithviShaw #Cricket #News18Lokmat pic.twitter.com/4rl1TjVsQl
— News18Lokmat (@News18lokmat) February 16, 2023
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ बसलेल्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांची नावे सना गिल आणि शोभित ठाकूर अशी असून यांच्यासोबत असलेल्यांचा तपास केला जात आहे. ही घटना 15 फेब्रुवारीच्या रात्री मुंबईतील विलेपार्ले परिसरात घडली. पृथ्वी शॉने सेल्फी घेण्यास नकार दिल्यानंतर हा वाद झाला. ओशिवरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 143, 148, 149, 384, 437, 504, 506 अन्वये पोलिसांनी सना गिल आणि शोभित ठाकूर यांच्यासह एकूण 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा : इंग्लंडने पहिल्याच दिवशी डाव केला घोषित, बेन स्टोक्सचा ‘डाव’ न्यूझीलंडवर पडला भारी पृथ्वी आणि त्याचा मित्र एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. यावेळी पृथ्वी शॉचा चाहता आणि एक मुलगी त्याच्या टेबलजवळ आले आणि फोटो घेऊ लागले. काही फोटो घेतल्यानंतर चाहता सतत व्हिडिओ आणि फोटो घेऊ लागला. तेव्हा पृथ्वी शॉने त्याचा मित्र आणि हॉटेल मालकाला फोन करून फॅन्सना हटवण्यास सांगितले. रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने त्या दोघांना बाहेर हाकलले. दरम्यान त्या दोघांसह काहीजण पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र रेस्टॉरंटमधून निघण्याची वाट पाहत थांबले होते. पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र बाहेर आल्यानंतर गाडीतून काही अंतरावर जाताना आरोपींनी कारला घेराव घातला. दरम्यान आरोपींन पृथ्वी शॉच्या मित्राच्या वाहनावर हल्ला करत काच फोडून मारामारी करू लागला. एवढेच नाही तर त्याने पृथ्वीच्या मित्राकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. सगळा गोंधळ सुरू असताना पृथ्वी शॉला ताबडतोब दुसऱ्या वाहनातून पाठवण्यात आले.