इंडोनेशिया, २३ ऑगस्ट- १८ व्या एशियाई खेळाच्या पाचव्या दिवशी टेनिसपटू अंकिता रैनाने भारतला कांस्य पदक जिंकून दिल्यानंतर १५ वर्षीय नेमबाज शार्दुल विहानने डबल ट्रॅप स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली आहे. भारताच्या खात्यात एकूण चार रौप्य पदक जमा झाले आहेत. कोरियाच्या ह्यूनवुडला या प्रकरात सुवर्णपदक मिळाले. तर कतारच्या हमाद अलीला कांस्य पदक मिळाले. आतापर्यंत भारताने १७ पदकांची कमाई केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.