जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Asia Cup च्या वेळापत्रकाची घोषणा, भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीखही ठरली

Asia Cup च्या वेळापत्रकाची घोषणा, भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीखही ठरली

आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला

आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला

आशिया कप 2023 च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान मॅचचा रोमांच पाहायला मिळणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 जुलै : आशिया कप 2023 च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे प्रमुख जय शाह यांनी आशिया कपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यंदा पहिल्यांदाच ही स्पर्धा दोन देशांमध्ये खेळवली जाणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये आशिया कपचे सामने होतील. भारताने पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिल्यानंतर आशिया कप दोन देशांमध्ये खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान आशिया कप खेळवला जाणार आहे. स्पर्धेचा पहिलाच सामना पाकिस्तान आणि नेपाळमध्ये मुलतानला होणार आहे. तर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन सामने होऊ शकतात. भारत-पाकिस्तान यांच्यातला ग्रुप स्टेजचा सामना 2 सप्टेंबरला होणार आहे. यानंतर सुपर-4 मध्ये जर या दोन्ही टीम क्वालिफाय झाल्या तर पुन्हा एकदा चाहत्यांना हा महामुकाबला पाहायला मिळणार आहे. तसंच 17 सप्टेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये या दोन्ही टीम पोहोचल्या तर तिसऱ्यांदा भारत-पाकिस्तान एकमेकांना भिडतील. यंदाचा आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे.

जाहिरात

ग्रुप ए मधल्या टीम भारत, पाकिस्तान, नेपाळ ग्रुप बी मधल्या टीम बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका भारताच्या ग्रुप स्टेजमधल्या मॅच 2 सप्टेंबर- भारत विरुद्ध पाकिस्तान- केण्डी, श्रीलंका 4 सप्टेंबर- भारत विरुद्ध नेपाळ- केण्डी, श्रीलंका

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात