मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Asia Cup : श्रीलंकेविरूद्ध गंभीरची भविष्यवाणी फेल, 'या' बॉलरनं चुकवला अंदाज

Asia Cup : श्रीलंकेविरूद्ध गंभीरची भविष्यवाणी फेल, 'या' बॉलरनं चुकवला अंदाज

Asia Cup 2022 : आशिया कप स्पर्धेतील भारत विरुद्ध श्रीलंका मॅचमध्ये गौतम गंभीरचा अंदाज एका भारतीय बॉलरनं साफ चुकवला.

Asia Cup 2022 : आशिया कप स्पर्धेतील भारत विरुद्ध श्रीलंका मॅचमध्ये गौतम गंभीरचा अंदाज एका भारतीय बॉलरनं साफ चुकवला.

Asia Cup 2022 : आशिया कप स्पर्धेतील भारत विरुद्ध श्रीलंका मॅचमध्ये गौतम गंभीरचा अंदाज एका भारतीय बॉलरनं साफ चुकवला.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 7 सप्टेंबर :   एकाहून एक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय क्रिकेट टीमला (Indian Cricket Team) आशिया कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत (Asia Cup 2022) पाकिस्तान आणि श्रीलंकन टीमकडून सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. दुबईच्या क्रिकेट स्टेडियममध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानविरुद्ध 182 आणि श्रीलंकेविरुद्ध 174 रन्स केल्या. पण प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यात गोलंदाज मात्र अपयशी ठरले. दुर्दैव म्हणजे दोन्ही मॅचमध्ये कॅप्टन (Captain) रोहित शर्माने टॉस हरला आणि भारताला आधी बॅटिंग करावी लागली. टीम इंडियाचा 15 सदस्यीय संघ आणि मैदानावर खेळणाऱ्या 11 खेळाडूंच्या निवडीवर आता दिग्गजांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामान्याच्या आधी लेग स्पिनर (Leg Spinner) युजवेंद्र चहलने तीन मॅचमध्ये केवळ 1 विकेट घेतली होती. भारतीय टीमचा माजी ओपनर बॅट्समन गौतम गंभीरने युजवेंद्रला टीमबाहेर ठेवावं, असं मत कॉमेंट्री करताना मांडलं होतं. परंतु, चहलनेच श्रीलंकेविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करत 3 विकेट घेतल्या. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचआधी मैदानावर खेळणाऱ्या 11 खेळाडूंत युजवेंद्र चहलच्या जागी फास्ट बॉलर गोलंदाज (Fast Bowler) आवेश खानला संधी देण्यात यावी, असं गौतम गंभीरनं म्हटलं होतं. पण आवेश खान अनफिट (Unfit) होता. त्यामुळे आर. अश्विनचा टीममध्ये समावेश करण्यात आला.

  वर्ल्ड कप जिंकायला निघाले पण आशिया कपमध्येच हरले, रोहित शर्माला या चुका पडल्या महागात

  चहल चमकला

  भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचे ओपनर फलंदाज पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी दमदार सुरूवात केली. दोघांनी पहिल्या 11 ओव्हर्समध्ये 97 रन्स केल्या. भारताचा अगदी सहज पराभव होईल, असं वाटत होतं. काही ओव्हर्सच बाकी होती. अशा स्थितीत कॅप्टन रोहित शर्माने 12 वी ओव्हर चहलला दिली. चहलचा पहिलाच चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या नादात पथुमने रोहित शर्माकडे झेल (Catch) दिला. यानंतर चौथा चेंडूवर चरित असलंकाने सूर्यकुमार यादवकडे कॅच दिला. निसांकाने 52 धावा केल्या. तर असलंकाला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर अश्विनने दानुष्का गुणतिलकाला केवळ एका धावेवर रन आऊट केलं.

  अश्विनची साथ मिळाल्यानंतर चहल आणखी आक्रामक झाला. त्याने 15 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर ओपनर कुसल मेंडिसला 57 रन्सवर पायचित (LBW) आऊट केलं. चहल आणि अश्विनने केवळ 25 बॉल्समध्ये 13 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या. या खेळीमुळे भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, भानुका राजपक्षे आणि दासून शनाकाच्या जोडीने नाबाद 64 धावांची भागीदारी करत श्रीलंकेला विजय मिळवून दिला. या सामन्यात युजवेंद्र चहलने 34 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे गंभीरचा सल्ला फोल ठरल्याचंच सिद्ध झालं असं म्हणावं लागेल.

  First published:

  Tags: Asia cup, Cricket news, Gautam gambhir, India Vs Sri lanka, Yuzvendra Chahal