जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs PAK Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तानचे कोचही लढतीसाठी तयार, अजूनही भळभळतेय द्रविडची जुनी जखम

IND vs PAK Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तानचे कोचही लढतीसाठी तयार, अजूनही भळभळतेय द्रविडची जुनी जखम

India vs Pakistan Saqlain Mushtaq Rahul Dravid

India vs Pakistan Saqlain Mushtaq Rahul Dravid

टीम इंडियाने आशिया कपमध्ये (Asia Cup) आजपासून आपल्या मोहिमेला सुरूवात केली आहे. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) आहे. मॅचमध्ये फक्त दोन्ही टीमच नाही तर कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सकलैन मुश्ताक (Saqlain Mushtaq) यांच्यातही टक्कर पाहायला मिळेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दुबई, 28 ऑगस्ट : टीम इंडियाने आशिया कपमध्ये (Asia Cup) आजपासून आपल्या मोहिमेला सुरूवात केली आहे. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) आहे. 6 टीमच्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान आणि हॉन्गकॉन्ग तर ग्रुप बीमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेला ठेवण्यात आलं आहे. मॅचमध्ये फक्त दोन्ही टीमच नाही तर कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सकलैन मुश्ताक (Saqlain Mushtaq) यांच्यातही टक्कर पाहायला मिळेल. या दोन्ही खेळाडूंचं रेकॉर्ड बघितलं तर सकलैनचं रेकॉर्ड द्रविडपेक्षा चांगलं आहे. राहुल द्रविडने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 3 मॅच खेळल्या आहेत, पण त्याची कामगिरी निराशाजनक झाली. द्रविडने 16 च्या सरासरीने 31 रन केले, त्याला 2 मॅचमध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळाली. 26 रन हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर होता. एवढच नाही तर 2 मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आणि एक मॅचचा निकाल लागला नाही. म्हणजेच राहुल द्रविड असताना टीम इंडिया आशिया कपमध्ये पाकिस्तानला हरवू शकली नाही. आता द्रविड कोच म्हणून टीमला विजय मिळवून देण्यासाठी इच्छूक असेल. एक शतक 2 अर्धशतकं राहुल द्रविडने आशिया कपमध्ये 13 मॅचच्या 9 इनिंगमध्ये 37 च्या सरासरीने 334 रन केले, यात एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 104 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. द्रविड टीममध्ये असताना भारत-पाकिस्तान यांच्यात 20 जुलै 1997 ला पहिल्यांदा सामना झाला. ही मॅच पावसामुळे होऊ शकली नाही. खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 9 ओव्हरमध्ये 30 रन देऊन 5 विकेट गमावल्या होत्या. व्यंकटेश प्रसादने 4 विकेट घेतल्या होत्या. रझ्झाकने घेतली द्रविडची विकेट द्रविड टीममध्ये असताना भारत-पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना 3 जून 2000 ला ढाक्यामध्ये झाला होता. पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत 7 विकेट गमावून 295 रन केले. मोहम्मद युसूफने नाबाद 100 रनची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा 251 रनवर ऑल आऊट झाला. द्रविडने 32 बॉलमध्ये 26 रन केले, अब्दुल रझ्झाकने द्रविडला एलबीडब्ल्यू केलं. द्रविड टीममध्ये असताना आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात तिसरा सामना 25 जुलै 2004 ला कोलंबोमध्ये झाला होता. पाकिस्तानने पहिले बॅटिंग करताना 9 विकेट गमावून 300 रन केल्या. शोएब मलिकने 143 रनची मोठी खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा 241 रनवर ऑलआऊट झाला. रझ्झाकने पुन्हा एकदा द्रविडला 5 रनवर आऊट केलं. द्रविड टीममध्ये असताना भारत-पाकिस्तान यांच्यात 58 वनडे मॅच झाल्या, यातल्या 22 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला तर 34 मॅचमध्ये टीमला पराभव स्वीकारावा लागला. 2 मॅचचा निकाल लागू शकला नाही. या दरम्यान द्रविडने 55 इनिंगमध्ये 37 च्या सरासरीने 1899 रन केले, यात 2 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. 105 रन ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. सकलैनची फक्त एक मॅच पाकिस्तानचा मुख्य कोच सकलैन मुश्ताक याने आशिया कपमध्ये भारताविरुद्ध फक्त एक मॅच खेळली. ही मॅच पावसामुळे पूर्ण होऊ शकली नाही. 20 जुलै 1997 साली झालेल्या या सामन्यात राहुल द्रविड भारतीय टीममध्ये होता. सकलैन मुश्ताक टीममध्ये असताना भारत-पाकिस्तान यांच्यात 36 वनडे झाल्या, यातल्या 20 मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय आणि 14 मॅचमध्ये पराभव झाला तर 2 मॅचचा निकाल लागू शकला नाही. ऑफ स्पिनर असलेल्या सकलैन मुश्ताकने 24 च्या सरासरीने 57 विकेट मिळवल्या. 45 रन देऊन 5 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताविरुद्ध सकलैनने 2 वेळा 4 आणि एकदा 5 विकेट घेतल्या, त्याने 4.52 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात