मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ashes : अंडरसनने बॅटिंगमध्ये केला ऐतिहासिक विक्रम, हे रेकॉर्ड तोडणं अशक्य!

Ashes : अंडरसनने बॅटिंगमध्ये केला ऐतिहासिक विक्रम, हे रेकॉर्ड तोडणं अशक्य!

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (Ashes Series) कांगारूंचं पारडं जड आहे. पण इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसनने (James Anderson) असा विक्रम केला, जो मोडणं अशक्य आहे. अंडरसनने हे रेकॉर्ड बॉलने नाही तर बॅटने केलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

ऍडलेड, 19 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (Ashes Series) कांगारूंचं पारडं जड आहे. ऑस्ट्रेलियाने पहिली इनिंग 473/9 वर घोषित केली. यानंतर इंग्लंडचा 236 रनवर ऑल आऊट झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 1 विकेटवर 45 रन एवढा झाला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आघाडी 282 रनपर्यंत पोहोचली. दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बॅटर आणि बॉलरनी धमाकेदार कामगिरी केली, पण इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसनने (James Anderson) असा विक्रम केला, जो मोडणं अशक्य आहे. अंडरसनने हे रेकॉर्ड बॉलने नाही तर बॅटने केलं.

अंडरसन क्रिकेट इतिहासातला पहिला खेळाडू बनला आहे, जो 100 वेळा नॉट आऊट राहत पॅव्हेलियनमध्ये परतला. अंडरसनची ही 167 वी टेस्ट आहे. अंडरसनचं हे रेकॉर्ड तुटणं जवळपास अशक्यच आहे.

अंडरसन पहिल्या इनिंगमध्ये 13 बॉलमध्ये 5 रनवर नाबाद राहिला. या यादीमध्ये वेस्ट इंडिजचा कोर्टनी वॉल्श दुसऱ्या क्रमांकावर आहे. वॉल्श त्याच्या करियरमध्ये 61 वेळा नॉट आऊट राहिला. तर मुरलीधरन 56 वेळा नॉट आऊट आणि बॉब विल्स 55 वेळा नॉट आऊट राहिले.

ऍशेस टेस्टची पहिली मॅच ऑस्ट्रेलियाने जिंकली. आता दुसऱ्या टेस्टमध्येही कांगारू मजबूत स्थितीमध्ये आहेत. इंग्लंडकडून डेव्हिड मलानने सर्वाधिक 80 रन केले, तर कर्णधार जो रूटने 62 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने 103 रन केले आणि स्टीव्ह स्मिथ 93 रनवर आऊट झाला.

First published:

Tags: Ashes, James anderson