जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ashes च्या पराभवानंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप, दोघांचा राजीनामा, तिसऱ्याची हकालपट्टी, चौथा रडारवर!

Ashes च्या पराभवानंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप, दोघांचा राजीनामा, तिसऱ्याची हकालपट्टी, चौथा रडारवर!

Ashes च्या पराभवानंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप, दोघांचा राजीनामा, तिसऱ्याची हकालपट्टी, चौथा रडारवर!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या ऍशेस सीरिजमध्ये (Ashes) इंग्लंडचा (Australia vs England) 4-0 ने पराभव झाला. या पराभवानंतर आता इंग्लंड क्रिकेटमध्ये (England Cricket) भूकंप आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 4 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या ऍशेस सीरिजमध्ये (Ashes) इंग्लंडचा (Australia vs England) 4-0 ने पराभव झाला. या पराभवानंतर आता इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप आला आहे. ऍशेसमधल्या मानहानीकारक पराभवानंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये राजीनाम्यांचं सत्र सुरू झालं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाईल्स (Ashley Giles) यांनी राजीनामा दिला, तर टीमचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड (Chris Silverwood) यांना पदावरून हटवण्यात आलं. यानंतर आता टीमचे सहाय्यक प्रशिक्षक ग्रॅहम थोर्प (Graham Thorpe) यांनीही आपलं पद सोलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. इंग्लंड क्रिकेटमधल्या तिघांनी राजीनामा दिल्यानंतर आता टीमचा कॅप्टन जो रूटवरही (Joe Root) टांगती तलवार कायम आहे. इंग्लंडच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी नव्या कोचची नियुक्ती केली जाईल. 24 फेब्रुवारीला इंग्लंडची टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. सहाय्य्क प्रशिक्षक म्हणून अनेक वर्ष इंग्लंड क्रिकेटची सेवा केल्याबद्दल मी ग्रॅहम थोर्प याचे आभार मानतो, तसंच त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असं इंग्लंड क्रिकेटचे अंतरिम व्यवस्थापकीय संचालक एणड्रयू स्ट्राऊसने सांगितलं.

जाहिरात

ग्राहम थोर्पने इंग्लंडकडून 100 टेस्ट मॅच खेळल्या, यात त्याने 44.66 च्या सरासरीने 6,744 रन केले, यात 16 शतकं आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 82 वनडेमध्ये 37.18 च्या सरासरीने 2,380 रन आणि 21 अर्धशतकं केली. इंग्लंडच्या टीमला 1968 नंतर कॅरेबियन जमिनीवर फक्त एक टेस्ट सीरिज जिंकता आली आहे. 2019 दौऱ्यावरही त्यांचा 2-1 ने पराभव झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ashes , england
  • First Published :
जाहिरात
जाहिरात