Home /News /sport /

Ashes 2021 : 'रूट अजूनही कॅप्टन कसा?', त्या वक्तव्यानंतर भडकला पॉण्टिंग

Ashes 2021 : 'रूट अजूनही कॅप्टन कसा?', त्या वक्तव्यानंतर भडकला पॉण्टिंग

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने (Ricky Ponting) ऍशेस सीरिजमध्ये (Ashes Series) इंग्लंडच्या लागोपाठ दुसऱ्या पराभवानंतर जो रूटवर (Joe Root) जोरदार टीका केली आहे.

    ऍडलेड, 21 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने (Ricky Ponting) ऍशेस सीरिजमध्ये (Ashes Series) इंग्लंडच्या लागोपाठ दुसऱ्या पराभवानंतर जो रूटवर (Joe Root) जोरदार टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट 275 रनने गमावल्यानंतर इंग्लंड 2-0 ने पिछाडीवर पडली आहे. मॅच संपल्यानंतर रूटने पहिल्या इनिंगमध्ये बॉलर्स योग्य लेन्थवर बॉलिंग करण्यात अपयशी ठरले, असं सांगत निशाणा साधला. यानंतर रिकी पॉण्टिंगने जो रूटच्या कॅप्टन्सीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूशी बोलताना रिकी पॉण्टिंग म्हणाला, 'जो रूटचं वक्तव्य ऐकून मला आश्चर्य वाटलं. बॉलरना बदल करायला सांगायचं काम कोणाचं आहे? मग तू कर्णधार का आहेस? बॉलरना योग्य लेन्थवर बॉलिंग करण्यासाठी तूला प्रेरित करता येत नसेल, तर तू मैदानात काय करत आहेस?', असे बोचरे प्रश्न पॉण्टिंगने जो रूटला विचारले आहेत. 'जर बॉलर कर्णधाराचं ऐकत नसेल, तर तो त्या बॉलरला बॉलिंगपासून हटवू शकतो. तू मैदानात बॉलरशी संवाद साधून नेमकं काय अपेक्षित आहे, ते सांगू शकतो. यालाच कॅप्टन्सी म्हणतात,' असं वक्तव्य पॉण्टिंगने केलं. दुसरी टेस्ट गमावल्यानंतर जो रूटने इंग्लंडच्या बॉलर्सवर निशाणा साधला होता. बॉल योग्य दिशेने टाकणं आणि विकेट घ्यायची संधी मिळवणं, महत्त्वाचं आहे. आम्ही साध्या गोष्टी योग्य केल्या नाहीत, त्यामुळे आम्हाला कामगिरी सुधारावी लागेल, असं रूट म्हणाला होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टला रविवारपासून मेलबर्नमध्ये सुरूवात होणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ashes, Joe root

    पुढील बातम्या